फ्रान्समध्ये गुरुवारपासून ३०३ प्रवाशांची चौकशी सुरू होती. या प्रकरणी भारतीय दूतावासानेही लक्ष घालत आढावा घेतला होता. दरम्यान, विमानतळावरच न्यायालय स्थापन करून प्रवाशांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विमानतळ प्रशासनाने विमान उड्डाणाला परवानगी दिली. न्यायालयीन प्रक्रियेतील त्रुटींमुळे सुनावणी रद्द केली गेली.
भारतीय झेंडा लावलेल्या जहाजावर ड्रोन अटॅक; लाल समुद्रात कुणी केला हल्ला?
advertisement
विमान उड्डाणाची परवानगी दिली असली तरी ते आता निकारागुआला जाणार की पुन्हा भारतात परतणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बहुतांश प्रवासी हे भारतीय असल्याने ते भारतात आणलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फ्रान्सच्या माध्यमांनुसार काही प्रवासी हे हिंदी, तामिळमध्ये बोलत होते. या विमानात ११ लहान मुले ही पालकांशिवाय प्रवास करत होती. १० प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रय घेण्यासाठी विनंती केली असल्याची माहिती समोर येतेय.
विमान रोमानियन चार्टर कंपनी लिजंड एअरलाइन्सच्या मालकीचे आहे. कंपनीच्या वकिलांनी सांगितले की, मानवी तस्करीत कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. एका भागिदार कंपनीने विमान भाड्याने घेतले होते आणि प्रत्येक प्रवाशाची ओळख आणि कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी त्यांची होती. उड्डाणाआधी प्रवाशांच्या पासपोर्टची माहिती विमान कंपनीला दिली जाते.