28 फेब्रुवारी, 2026 रोजी इराणचे सर्वेसर्वा लिडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली. अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात खोमेनेई यांचं कुटुंब ही ठार झालं. याामध्ये त्यांची पत्नी आणि मुलींचाही समावेश आहे. अवघ्या ६० सेकंदामध्ये ही कारवाई करण्यात आली होती. अमेरिका आणि इस्त्रायलने खामेनेईचं ठिकाण कुठे शोधून काढलं, हल्ल्यातून ते कसे वाचू शकले नाही, याबद्दल चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहे.
advertisement
कॅमेरे झाले हॅक
असं सांगितलं जात आहे की, मोसाद संघटना मागील काही वर्षांपासून इराणमध्ये घुसली होती. अनेक ठिकाणी ती गुप्तपणे काम करत होती, अशी माहिती समोर आली. इराणमधील कॅमेरे हे बऱ्याच दिवसांपासून हॅक झाले होते. त्यामुळे मोसादची खोमेनेई यांच्यावर नजर होती. इस्त्रायलने खामेनेई आणि वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांना ट्रॅक करण्यासाठी तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते.
अधिकाऱ्यांवर तिसऱ्या डोळ्यातून नजर
फायनाशियल्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायलने खामेनेई आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांच्या बॉडीगार्ड्सवर नजर ठेवण्यासाठी तेहरानमधील मोठ्या ट्रॅफिक कॅमेरा नेटवर्कमध्ये एंट्री केली होती. हे कॅमेरे मोसादने हॅक केले होते. त्यामुळे खोमेनेई यांच्यावर नजर ठेवली जात होती. विशेष म्हणजे, इराण सरकार देशभरात कॅमेऱ्याचं जाळ पसरवलं होतं. या कॅमेऱ्यातून देशभरात आंदोलन करणारे असेल किंवा कुणाला ट्रॅक करायचं असेल त्यासाठी काम करणारी ही महत्त्वाची यंत्रणा होती.
इस्त्रायलाला वर्षभरापुर्वीच मिळाला कॅमेऱ्याचा एक्सेस
पण इस्त्रायलच्या मोसाद संघटनेनं कॅमेरे हॅक केले आणि त्यांचीच यंत्रणाा त्यांच्याविरोधात वापरली, असल्याचं सांगितलं जात आहे. इस्त्रायलला वर्षांपूर्वी कॅमेर्यांचा अॅक्सेस मिळाला होता. यातून त्यांनी कॅमेऱ्यावर खोमेनेई यांचा ताफा ट्रॅक करत होते. खामेनेईच्या सिक्युरिटी गार्डचे सदस्य आपली कार कुठे पार्क करता, हे सगळं पाहत होती. एवढंच नाहीतर सुरक्षारक्षकांचे पत्ते, कामाचं शेड्युअल, कोण कुठे नियुक्त आहे, याची फाईल तयार केली होती.
अमेरिकेनं मोबाईल सेवा केली बंद
एवढंच नाहीतर इस्त्रायल आणि अमेरिकेनं तेहरानमध्ये पाश्चर स्ट्रीटवर सेलुलर सर्व्हिस बंद केली होती, जिथे खामेनेईची हत्या झाली. हे यासाठी केलं होतं की, सुरक्षारक्षकांना मेसेज हे उशिरा पोहोचतील, बिझी सिग्नलमुळे संपर्क साधता येणार नाही, असं प्लॅनिंग केलं होतं, त्याचा फायदाही झाला.
AI चा केला वापर
इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्याआधी AI चा सुद्धा वापर केल्याचं समोर आलं आहे. इराणमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AI टुल्स अल्गोरिदम वापरलं. या डेटाने त्यांना खामेनेईला शनिवारच्या मीटिंगपर्यंत ट्रॅक करण्यात मदत केली, जिथे खोमेनेईची बैठक संपली होती. तसंच, युनायटेड स्टेट्सच्या CIAकडे एक ह्यूमन सोर्स होता, ज्याने वेळोवेळी महत्त्वाची माहिती पुरवली.
