इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की इराणचे हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आर्मेनियाच्या मार्गे बाहेर काढले जात आहे. आर्मेनियामधून त्यांना जॉर्जियामार्गे आणि मग पश्चिम आशियाच्या मार्गाने भारतात आणले जाऊ शकते. 110 विद्यार्थ्यांचा पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला आहे.
advertisement
मी कंडोम करतो..., इस्रायल-इराण युद्धात हिरो होण्याच्या नादात देशाची लाज घालवली
माहितीनुसार, तीन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांना देखील हलवले जात आहे. इराणमध्ये सुमारे दीड हजार काश्मिरींसह सुमारे 10,000 भारतीय विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी इराणमध्ये गेले आहेत.
दूतावासाने जारी केली एडवाइजरी
दरम्यान इराणमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली आहे. यात असे म्हटले आहे की जे भारतीय किंवा भारतीय मूळाचे लोक स्वतःच्या संसाधनांद्वारे तेहरानच्या बाहेर जाऊ शकतात, त्यांनी शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी निघून जावे. इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे, सर्व भारतीय नागरिक आणि पीआयओ (भारतीय मूळाचे व्यक्ती) जे स्वतःच्या संसाधनांचा वापर करून तेहरानमधून बाहेर जाऊ शकतात. त्यांना शहराबाहेर सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
सर्वात घातक फायटर जेटचे Emergency लँडिंग, रात्री 9:30 वाजता Airportवर काय घडले
भारत सरकार अलर्ट
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, तेहरानमधील भारतीय दूतावास सतत सुरक्षेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहे. काही विद्यार्थ्यांना दूतावासाच्या मदतीने इराणमधीलच सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. इतर शक्य पर्यायांवर देखील विचार केला जात आहे. यासंबंधी अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्रायल आणि इराणमधील भारतीय दूतावासांनी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या X हँडलवरून सल्लागार सूचना जारी केल्या आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणमधील सद्यस्थिती लक्षात घेता येथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय मूळाच्या लोकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे. कोणत्याही अनावश्यक गोष्टींपासून दूर राहावे. दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांवर दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
