मी कंडोम करतो..., इस्रायल-इराण युद्धात हिरो होण्याच्या नादात देशाची लाज घालवली; जगाने विचारला शिक्षणाचा दर्जा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shahbaz Sharif Condom Remark: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्रायलच्या हल्ल्याची निंदा करताना "condemn" ऐवजी "condom" शब्द वापरला, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची थट्टा सुरू आहे.
कराची: शेजारी देश पाकिस्तानमध्ये लोकांच्या शिक्षणाच्या पातळीचा अंदाज खुद्द पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टवरूनच लावता येतो. इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या मित्र खामेनेईच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहीत होते. मात्र त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) हँडलवर इस्रायलच्या हल्ल्याचा इंग्रजीत "condemn" (निंदा) करण्याऐवजी "condom" (कॉन्डोम) असा शब्द वापरला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची प्रचंड थट्टा सुरू आहे. फक्त पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरात त्यांचा उपहास केला जातोय.
पाकिस्तानमधील शिक्षणाचा दर्जा काय आहे?
UNICEF च्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये 5–16 वयोगटातील सुमारे 2 कोटी 28 लाख मुलं शाळेबाहेर आहेत. जे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक आहे. हा आकडा देशातील एकूण मुलांच्या लोकसंख्येच्या सुमारे 44% इतका आहे. UNESCO‑GEM चा अहवाल सांगतो की मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पाकिस्तानची प्रगती अत्यंत धीमी आहे आणि दक्षिण-पश्चिम आशियामधील सर्वात कमकुवत स्थितीत आहे. सरकारी खर्च जीडीपीच्या फक्त 1.9% ते 2.1% दरम्यान आहे. जी UNESCO च्या 4% च्या शिफारशीच्या खूपच खाली आहे.
advertisement
शहबाज यांनी सोशल मीडियावर काय लिहिलं होतं?
मी अत्यंत तीव्रतेने आणि ठामपणे, कोणत्याही उकसाव्याशिवाय इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याची condemn (त्यांच्या पोस्टमध्ये चुकून condom लिहिलं) करतो. या हल्ल्यात इराणच्या लोकांचा मृत्यू झाला याबद्दल माझ्या संवेदना त्यांच्या परिवारांसोबत आहेत. हा प्रकार अतिशय गैरजबाबदार असून आधीच नाजूक असलेल्या या परिसराला अधिक अस्थिर करेल. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांकडे विनंती करतो की, हे रोखण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
advertisement
शहबाज यांनी त्वरित पोस्ट डिलीट केली
view commentsसोशल मीडियावर थट्टा होत असल्याचं लक्षात येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तत्काळ ही पोस्ट डिलीट केली. मात्र तोपर्यंत जे व्हायचे होते ते झालेच होते. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टचे स्क्रीनशॉट्स घेतले गेले आणि ते सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत. काहींनी ही पोस्ट एडिट करून बनवली गेली का, असा प्रश्नही उपस्थित केला. यावर X च्या AI प्रणाली Grok ला विचारण्यात आलं. त्याने सांगितलं की, आम्ही डिलीट झालेली पोस्ट पुन्हा दाखवू शकत नाही. पण 13 जूनच्या त्या पोस्टविषयी चर्चा सुरू असून, ती पोस्ट खरीच होती असं मानलं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
मी कंडोम करतो..., इस्रायल-इराण युद्धात हिरो होण्याच्या नादात देशाची लाज घालवली; जगाने विचारला शिक्षणाचा दर्जा


