तरीदेखील ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची तंत्रज्ञान पाकिस्तानच्या माध्यमातून चीनपर्यंत पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे 2 मे 2011 रोजी नेवी सील कमांडोंनी लादेनला ठार केलं आणि अगदी दोन वर्षांनंतर 2013 मध्ये चीनने Z-20 हेलिकॉप्टरची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली. चीनने UH-60 ब्लॅक हॉकची हुबेहूब नक्कल Z-20 तयार केली. या हेलिकॉप्टरचा सिव्हिलियन व्हर्जन S-70C-2 आधीपासून चीनकडे होता. असा अंदाज आहे की चीनने डिझाईन तिथूनच चोरलं असावं.
advertisement
F-35 आणि F-16 ची देखील नक्कल
अमेरिकेला असं वाटतं की ज्या मित्रदेशांना तो आपले एअरक्राफ्ट किंवा अत्याधुनिक सैन्य साहित्य विकतो, त्यामार्फत चीन बॅकडोअर चॅनेलने तंत्रज्ञान मिळवतो. एका रिपोर्टनुसार अमेरिका लॉकहीड मार्टिन F-22 रॅप्टर स्टेल्थ फायटर कोणत्याही देशाला विकणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
धाडसी अंदाज! सोनं, चांदी, जमीन सर्व मागे पडेल; मग सर्वात मौल्यवान काय होणार?
रिव्हर्स इंजिनीअरिंगवर जारी रिपोर्टनुसार, अमेरिकन F-35 चे क्लोन शेनयांग FC-31 (J-35) चीनने 2013 पासून तयार करायला सुरुवात केली होती. विमानाचा फ्यूसेलाज, कॉकपिट, कैनोपी हे सर्व F-35 प्रमाणेच आहे. दिसायला दोन्ही पाचव्या पिढीतील स्टेल्थ एअरक्राफ्ट एकसारखेच वाटतात.
चीनच्या हाती लागले महाभयानक Missile, अमेरिकेसह संपूर्ण युरोपची झोप उडाली
अमेरिकन F-16 ची चीनी आवृत्ती J-10 नावाने तयार करण्यात आली असून ती चीनच्या लष्करी सेनेचा भाग आहे. चीनच्या चेंगदू एअरक्राफ्ट इंडस्ट्री ग्रुपने हे विमान रिव्हर्स इंजिनीअरिंगच्या माध्यमातून तयार केलं आहे. त्याचा डिझाईन F-16 सारखाच दिसतो. सध्या चीनकडे जवळपास 600 J-10 सिंगल इंजिन मल्टीरोल जेट्स आहेत.
ड्रोनपासून ट्रान्सपोर्टपर्यंत तंत्रज्ञान चोरी
अमेरिकेने एअरक्राफ्ट कॅरियरवरून ऑपरेट करता येईल असा Unmanned Combat Air Vehicle (UCAV) X-47B तयार केला होता. त्याची पहिली चाचणी 2011 मध्ये झाली. बरोबर दहा वर्षांनी त्याची चिनी नक्कल लिजिआन शार्प स्वॉर्ड UCAV CH-7 चीनने तयार केली.
MQ-8 फायर स्काउट नावाच्या अमेरिकन अनमॅन्ड हेलिकॉप्टरचा चिनी क्लोन SVU-200 Flying Tiger म्हणून तयार झाला आहे. त्याचप्रमाणे MQ-9 प्रीडेटर ड्रोनच्या चिनी आवृत्त्या Chengdu Wing Loong, CH-4/5/6/7 चिनी सैन्यात वापरल्या जात आहेत.
अमेरिकन हमवी लाइट ट्रकचा क्लोन डॉंगफेंग EQ2050 ब्रेव सोल्जर नावाने चीनी सैन्यात वापरला जातो.
जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानाची तंत्रज्ञान चोरी
चीनने जो सर्वात मोठा हात मारला तो होता अमेरिकेच्या C-17 ग्लोबमास्टर III या मालवाहू विमानाच्या तंत्रज्ञानावर. चीनने हे क्लासिफाईड डिझाईन डॉक्स बोईंग कंपनीकडून चोरले. चिनी हॅकर्सनी C-17 शी संबंधित 6,30,000 फाइल्स चोरून त्या एका चिनी कंपनीला विकल्या. आज चीनकडे अमेरिकेच्या C-17 ची हुबेहूब नक्कल असलेलं Y-20 नावाचं विमान उपलब्ध आहे.
रडार विमानाचीही हुबेहूब नक्कल
अमेरिकन नौदलाच्या E-2 Hawkeye एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिमची हुबेहूब नक्कल KJ-600 नावाने चीनकडे आहे.