सोनं, चांदी, जमीन सर्व मागे पडेल; मग सर्वात मौल्यवान काय होणार? धाडसी अंदाज कोणी व्यक्त केला?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Energy Currency: झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांचा असा विश्वास आहे की पुढील 10 वर्षांत इलेक्ट्रॉन आणि ऊर्जा चलन बनू शकतात. डेटा सेंटर्स आणि एआयच्या वाढत्या वीज वापरामुळे ऊर्जेचे महत्त्व वाढेल.
मुंबई: झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ज्यामुळे भविष्यातील चलन आणि आर्थिक व्यवस्थेबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मते येत्या 10 वर्षांत रोख रक्कम, सोने, चांदी, मौल्यवान दागिने किंवा जमीन यापेक्षा इलेक्ट्रॉन आणि ऊर्जा (Energy) अधिक मौल्यवान 'करन्सी' बनू शकते. कामत यांचा हा विचार केवळ एक कल्पना नसून डेटा सेंटर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या वीज वापरावरील संशोधनावर आधारित आहे.
डेटा सेंटर्स आणि विजेचा वाढता वापर
कामत यांच्या मतानुसार, आपली प्रत्येक ऑनलाइन कृती - जसे की नेटफ्लिक्स पाहणे किंवा फाईल क्लाउडमध्ये सेव्ह करणे - डेटा सेंटर्समध्ये प्रक्रिया केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्येक नवीन डेटा सेंटर वर्षाला 4 लाख इलेक्ट्रिक गाड्यांच्या एकूण वीज वापरापेक्षा जास्त ऊर्जा वापरते. यामुळेच कोणत्याही डेटा सेंटरच्या एकूण खर्चापैकी 65% खर्च केवळ वीज (कंप्यूटिंग आणि कूलिंग) वर होतो.
advertisement
चीनच्या हाती लागले महाभयानक Missile, अमेरिकेसह संपूर्ण युरोपची झोप उडाली
जगामध्ये सर्वाधिक 3,680 डेटा सेंटर्स अमेरिकेत आहेत. त्यानंतर जर्मनी (424) आणि यूके (418) यांचा क्रमांक लागतो. भारत या यादीत सातव्या स्थानावर असून येथे 262 डेटा सेंटर्स आहेत. सर्वरची संख्या वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. संशोधनानुसार, 2030 पर्यंत डेटा सेंटर्स जगातील एकूण विजेच्या 10% वापर करतील असा अंदाज आहे.
advertisement
AI चा वाढता वीज वापर
संशोधनानुसार जर जगातील केवळ 5% इंटरनेट शोध AI च्या मदतीने केले गेले. तर त्यासाठी लागणारी वीज 10 लाख भारतीय घरांना वर्षभर प्रकाशित करण्यासाठी पुरेशी असेल. ही बाब AI ची खरी किंमत दर्शवते. OpenAI चे सॅम ऑल्टमॅन यांनी म्हटले होते की, "कृपया" आणि "धन्यवाद" यांसारखे शब्दही कोट्यवधी डॉलर्स खर्च करायला लावतात.
advertisement
'एनर्जी करन्सी' म्हणजे काय?
निखिल कामत यांच्या मते, जर वीज प्रत्येक डिजिटल क्रियेचा कणा बनली असेल. तर तिला 'करन्सी'चा दर्जा का देऊ नये? जसे कंपन्या डॉलर किंवा युरोच्या चढ-उतारापासून वाचण्यासाठी करन्सी हेजिंग करतात, त्याचप्रमाणे भविष्यात त्या विजेच्या किमतींबाबतही हेजिंग सुरू करू शकतात. याचा अर्थ ऊर्जा देखील एक 'एसेट' (मालमत्ता) म्हणून ट्रेड केली जाईल. कल्पना करा जर सुपरमार्केट किंवा डेटा सेंटर्स किलोवॉट-अवरची ट्रेडिंग करतील, जसे आज परकीय चलन किंवा बिटकॉइनची होते. भविष्यात ब्लॉकचेन-आधारित 'एनर्जी टोकन' देखील येऊ शकतात. ज्यामुळे ऊर्जेची देवाणघेवाण डिजिटल चलनाप्रमाणे होईल.
advertisement
आर्थिक विचारांमध्ये बदल अपेक्षित?
जर असे झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल होऊ शकतात. महागाईचे मापदंड, बँकिंग प्रणाली आणि अगदी 'मूल्य' (Value) या शब्दाची परिभाषा देखील नव्याने समजून घ्यावी लागेल. भविष्यात संपत्ती केवळ पैशांनीच नव्हे तर तुमच्याकडे असलेल्या एनर्जी क्रेडिट्सने देखील मोजली जाऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 10, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/मनी/
सोनं, चांदी, जमीन सर्व मागे पडेल; मग सर्वात मौल्यवान काय होणार? धाडसी अंदाज कोणी व्यक्त केला?