इराणचे परराष्ट्र मंत्री इस्तंबूलमधील पत्रकार परिषदेत म्हणाले, मी आज दुपारी मास्कोला रवाना होत आहे आणि उद्या सकाळी अध्यक्ष पुतिन यांच्याशी माझी भेट आहे. रशिया हा इराणचा विश्वासू मित्र आहे.
अमेरिकाचा इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला, मोदींचा तेहरानला कॉल; केली मोठी मागणी
या पार्श्वभूमीवर, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलीग्रामवर लिहिले की, “शांती स्थापनेसाठी अध्यक्ष झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेला नव्या युद्धात ढकलले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन लवकरच काबूलमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक घेणार असल्याचे अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे.
advertisement
इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी रविवारी स्पष्ट केले की, अमेरिकेने त्यांच्या अणुउद्योग केंद्रांवर हल्ला करून कूटनीतीचे सर्व मार्ग बंद केले आहेत. या हल्ल्यांनंतर आम्ही जे काही उत्तर देऊ. त्यासाठी पूर्णपणे वॉशिंग्टन जबाबदार असेल, असे ते म्हणाले.
त्यांनी असेही सांगितले की, अमेरिकेने अशी एकही ‘लक्ष्मणरेषा’ उरलेली नाही जी त्याने ओलांडलेली नाही. जरी कूटनीतीचा मार्ग नेहमी खुला ठेवावा असे आम्हाला वाटते, तरी आता तो मार्गच संपला आहे.
अमेरिकेने केली सर्वात मोठी चूक, महायुद्धापेक्षा भयानक; बुश सारखे फसणार ट्रम्प
तुर्कस्तानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अराक्ची यांनी अमेरिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. अमेरिकेत सध्या युद्धखोर आणि अराजकवादी प्रशासन आहे. त्याचे आक्रमक कृत्य अत्यंत धोकादायक असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. यासाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.
इराणवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्यांनंतर परराष्ट्र मंत्री अराक्ची यांची ही पहिली अधिकृत प्रतिक्रिया आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेने अणुउद्योग केंद्रांवर हल्ला करून अखेरची आणि सर्वात धोकादायक लक्ष्मणरेषा पार केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आता संघर्ष टाळण्याचा कोणताही शांततामय मार्ग शिल्लक राहिलेला नाही आणि अमेरिका याचे परिणाम भोगेल.
