US Attack Iran: अमेरिकाचा इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला, PM मोदींचा तेहरानला कॉल; केली सर्वात मोठी मागणी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
PM Narendra Modi: मध्य पूर्वेतील तणाव वाढला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्यात महत्त्वपूर्ण संवाद झाला. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर मोदींनी शांततेचे आवाहन करत कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला.
नवी दिल्ली: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. रविवारी खुद्द पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. हे संभाषण अशा काळात झाले आहे जेव्हा इस्रायलच्या हल्ल्यांना समर्थन देत अमेरिकन लष्कराने रविवारी पहाटे इराणच्या तीन अणु केंद्रांवर जोरदार हल्ले केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. अलीकडील तणाववाढीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. पुढे जाण्यासाठी त्वरित तणाव कमी करण्याचे, संवाद व कूटनीतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन पुन्हा एकदा केलं. क्षेत्रात शांतता, सुरक्षितता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी अशी मागणी केली.
Spoke with President of Iran @drpezeshkian. We discussed in detail about the current situation. Expressed deep concern at the recent escalations. Reiterated our call for immediate de-escalation, dialogue and diplomacy as the way forward and for early restoration of regional…
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
advertisement
इराणची अणु केंद्रे उद्ध्वस्त
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांची माहिती देताना सांगितले की, इराणची अणुउर्जा केंद्रे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. यासोबतच ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की- जर त्यांनी प्रतिउत्तर दिले, तर आणखी प्रचंड हल्ले करण्यात येतील.
इराणमध्ये शांतता नसेल, तर भयंकर...- ट्रम्प
ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिका अचूकता, वेग आणि कौशल्य यांद्वारे अशा आणखी केंद्रांवर निशाणा साधू शकतो. व्हाइट हाऊस मधून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्यांनी म्हटलं, इराणमध्ये शांतता प्रस्थापित होईल किंवा मागील आठवड्याभरात जे घडले त्यापेक्षा कितीतरी पटींनी भयंकर त्रासदी पाहायला मिळेल.
फोर्डो केंद्रावर ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब हल्ला
दरम्यान, इराणच्या अणुऊर्जा संस्थेने फोर्डो, इस्फहान आणि नतांज येथील अणु केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली. तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, शत्रूंच्या कटकारस्थानांनंतरही इराण पुन्हा उभं राहील – कारण आमच्याकडे हजारो क्रांतिकारी आणि समर्पित वैज्ञानिक व तज्ज्ञ आहेत. एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन लष्कराने पर्वतरांगांमध्ये वसलेल्या फोर्डो अणुऊर्जा संवर्धन केंद्रावर ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब टाकून निशाणा साधला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 4:16 PM IST
मराठी बातम्या/देश/
US Attack Iran: अमेरिकाचा इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला, PM मोदींचा तेहरानला कॉल; केली सर्वात मोठी मागणी