आज सकाळी इराणकडून डागलेले एक क्षेपणास्त्र दुबईच्या एअर डिफेन्स सिस्टमने हवेतच उडवले, मात्र त्याचा राडारोडा (मलबा) थेट विमानतळ परिसरात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाचे कामकाज तात्काळ बंद करण्यात आले होते.
इराणकडून दुबईच्या दिशेने एक बॅलिस्टिक मिसाइल डागण्यात आले होते. दुबईच्या संरक्षण यंत्रणेने ते मिसाइल यशस्वीपणे इंटरसेप्ट केले, पण त्याचे तुकडे विमानतळाच्या धावपट्टीजवळ आणि परिसरात पडले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने 'रेड अलर्ट' जारी करून सर्व उड्डाणे थांबवली. यामुळे हजारो भारतीय प्रवाशांसह जगभरातील पर्यटकांचा खोळंबा झाला.
advertisement
विमानतळ प्रशासनाने आता ट्विटरवर पोस्ट करून सेवा अंशतः सुरू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, प्रवाशांसाठी काही कडक सूचना जारी केल्या आहेत. जोपर्यंत तुमची एअरलाईन स्वतः संपर्क करून फ्लाईट कन्फर्म असल्याचे सांगत नाही, तोपर्यंत विमानतळाकडे निघू नका. युद्धाच्या परिस्थितीमुळे उड्डाणांच्या वेळा सतत बदलत आहेत. काही ठराविक उड्डाणे दुबई आंतरराष्ट्रीय आणि अल मकतूम विमानतळावरून ऑपरेट केली जात आहेत.
