एस सेंट्रल कमांडने ट्विटरवर म्हटलं की, गैबॉनची मालकी असलेला टँकर एमवी साईबाबा कडून काही हानी झाल्याची माहिती दिली नाही. पण अमेरिकन युद्धनौकेला इमर्जन्सी कॉल केला. हा हल्ला भारतीय किनारपट्टीवर आणखी एका टँकरवर झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी झाला. या हल्ल्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रात्री जवळपास ८ वाजण्याच्या सुमारास अमेरिकन लष्कराला दक्षिण लाल समुद्रात दोन जहाजांवर हल्ल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एकावर नॉर्वेचा झेंडा होता तर एम व्ही ब्लामेनन नावाच्या रासायनिक टँकरने माहिती दिली होती. हुतींकडून सोडलेला ड्रोन जहाजाजवळून गेला. तर ज्या जहाजावर ड्रोन हल्ला झाला ते एम, व्ही साईबाबा आहे.
advertisement
गेल्या महिन्यात हिंदी महासागरात इराणच्या इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून एक संशयित ड्रोन हल्ल्यात इस्रायलची मालकी असलेलं मालवाहू जहाज उद्ध्वस्त झालं होतं. एंब्रे के ने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलशी संबंधित कंपनीशी करारबद्ध असलेलं माल्टाचं जहाज उद्ध्वस्त झालं होतं.