कतर एनर्जीचे सीईओ हळहळले
कतर एनर्जीचे सीईओ साद अल-काबी यांनी रॉयटर्सशी बोलताना आपला संताप आणि दुःख व्यक्त केलं. एखादा मित्र मुस्लिम देश, तो ही रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारे हल्ला करेल, असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. या हल्ल्याने संपूर्ण क्षेत्राला १० ते २० वर्षे मागे ढकललं आहे, असं अल-काबी म्हणाले. कतरने आता इटली, बेल्जियम, दक्षिण कोरिया आणि चीनला होणाऱ्या गॅस पुरवठ्याबाबत 'फोर्स मेज्योर' (अपवादात्मक परिस्थितीत करार पाळता न येणे) घोषित केले आहे.
advertisement
उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
इराणच्या या हल्ल्यात कतरच्या १४ पैकी २ एलएनजी ट्रेन्स आणि एक जीटीएल सुविधा पूर्णपणे निकामी झाली आहे. साद अल-काबी यांच्या मते, या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी किमान ३ ते ५ वर्षांचा काळ लागेल. तोपर्यंत प्रतिवर्षी १२.८ दशलक्ष टन एलएनजी उत्पादनात घट होईल. या प्रकल्पांमध्ये अमेरिकेची दिग्गज कंपनी एक्सॉनमोबिल आणि शेल यांची मोठी भागीदारी आहे, त्यामुळे हा वाद आता जागतिक स्तरावर पेटण्याची शक्यता आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा?
कतर हा भारताला एलएनजी पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. कतरच्या उत्पादनात घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती गगनाला भिडू शकतात. जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तर भारतात सीएनजी (CNG) आणि घरगुती गॅसच्या दरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
