TRENDING:

Iran Israel Conflict: इस्रायलच्या मराठी बहुल भागावर इराणचा हल्ला, ४७ जखमी, टार्गेटवर नेमकं कोण?

Last Updated:

Iran Attack Israel Nuclear Plant : इराणने डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमधील डिमोना (Dimona) शहरावर कोसळले. इस्रायलमधील हा भाग तिथल्या मोठ्या भारतीय समुदायामुळे 'लिटिल इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. याच भागात मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेल अवीव: इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने शनिवारी रात्री एक अत्यंत भयावह वळण घेतले. इराणने डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दक्षिण इस्रायलमधील डिमोना (Dimona) शहरावर कोसळले. इस्रायलमधील हा भाग तिथल्या मोठ्या भारतीय समुदायामुळे 'लिटिल इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. याच भागात मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे. या भीषण हल्ल्यात एका १२ वर्षीय मुलासह किमान ४७ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेले मिसाईल इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला रोखण्यास अपयश आले. त्यामुळे आता इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली का, याची चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायलच्या मराठी बहुल भागावर इराणचा हल्ला, ४७ जखमी, टार्गेटवर कोण?
इस्रायलच्या मराठी बहुल भागावर इराणचा हल्ला, ४७ जखमी, टार्गेटवर कोण?
advertisement

मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा असणारं शहर...

डिमोना शहरात जवळपास ३० टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे ७,५०० भारतीय वंशाचे ज्यू राहतात. यातील बहुतांशी जण जे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. येथे अनेक घराघरात मराठी बोलली जाते आणि गल्लीबोळात भारतीय खाद्यपदार्थ (सोनपापडी, भेळपुरी, गुलाबजाम) सहज मिळते. इराणचे क्षेपणास्त्र एका कम्युनिटी बिल्डिंगवर पडल्याने आसपासच्या जुन्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, सायरेन वाजताच बहुतांश नागरिक सुरक्षित निवाऱ्यात (Shelters) पोहोचल्याने मोठी जीवितहानी टळली.

advertisement

टार्गेटवर कोण?

इस्रायलने शनिवारी, इराणच्या नतांझ या अणू प्रकल्पावर हल्ला केला. इराणचं आण्विक केंद्र उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणू प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींची प्रकृती कशी?

advertisement

'मॅगन डेव्हिड ॲडम' (MDA) या आपत्कालीन संस्थेच्या माहितीनुसार,ढिगाऱ्याखाली दबल्याने आणि छर्रे लागल्याने एक १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे. ३१ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. १४ जणांना प्रचंड मानसिक धक्क्यामुळे (Anxiety) रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

इस्रायलची हवाई यंत्रणा अपयशी...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

हवाई संरक्षण यंत्रणा हे क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात अपयशी ठरली असल्याची कबुली इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिली आहे. इराणने या हल्ल्याला आपल्या 'नतांझ' अणू केंद्रावरील हल्ल्याला 'प्रत्युत्तर' असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डिमोना येथील अणू संशोधन केंद्र सुरक्षित असून तिथे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran Israel Conflict: इस्रायलच्या मराठी बहुल भागावर इराणचा हल्ला, ४७ जखमी, टार्गेटवर नेमकं कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल