TRENDING:

इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, रियाधमध्ये भीषण स्फोट, दूतावासावरही ड्रोन हल्ला, VIDEO

Last Updated:

इराणच्या ड्रोन हल्ल्यात रियाधमधील US Embassy ला आग लागली, डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर प्रत्युत्तराचा इशारा दिला. सौदी अरेबियात हाय अलर्ट आणि नागरिकांना सूचना.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्य-पूर्वेतील युद्धाने आता अतिशय भयानक वळण घेतले आहे. इराणने पुकारलेल्या प्रतिहल्ल्यांच्या सत्रात आता थेट सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासाला (US Embassy) लक्ष्य करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे दोन आत्मघाती ड्रोन्सनी दूतावासावर हल्ला केला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला असून, "जशास तसं उत्तर लवकरच मिळेल," असा इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे अमेरिकन दूतावासाच्या इमारतीला दोन ड्रोन्सनी धडक दिली. या हल्ल्यामुळे दूतावासाच्या परिसरात आग लागली असून इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत होते. सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रियाधच्या दिशेने येणारे इतर चार ड्रोन्स हवेतच नष्ट केले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

advertisement

अमेरिकन नागरिकांना शेल्टरमध्ये राहण्याचे आदेश

या हल्ल्यानंतर अमेरिकन दूतावासाने हाय अलर्ट जारी केला आहे. जेद्दाह, रियाध आणि धहरानमधील अमेरिकन नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या (Shelter-in-place) सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, लष्करी तळांच्या आसपास प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली असून, सर्वांना स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲक्शन मोड

advertisement

या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'न्यूजनेशन'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, अमेरिका कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार हे लवकरच जगासमोर येईल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्षाची ठिणगी पडली असून, युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

advertisement

सौदी अरेबियात हाय अलर्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

सौदी सरकारने आपल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक (९११) आणि इतर मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. इराणकडून आखाती देशांमधील अमेरिकन तळांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, रियाधमध्ये भीषण स्फोट, दूतावासावरही ड्रोन हल्ला, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल