तेहरानने स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत इराणवर हल्ले सुरू राहतील आणि अमेरिका या आक्रमकतेचा भाग असेल, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची राजयकीय चर्चा शक्य नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी म्हटले, ज्या कूटनीतीवर बॉम्बांचे सावट आहे, त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
खामेनेई यांना हात लावून दाखवा, Pandora Box ओपन होईल; रशियाची महाभयंकर धमकी
advertisement
बोलण्याने काही बदल होईल का?
हा खवळलेला संदेश अशा वेळी आला आहे जेव्हा जगभरातील मोठे नेते शांततेचे आवाहन करत आहेत. बीजिंगमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मिडल ईस्टमधील सद्य परिस्थितीवर ‘चार सूत्रीय प्रस्ताव’ मांडला. यामध्ये युद्धबंदी, नागरिकांचे संरक्षण, संवादाचा प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा समावेश होता. पण तेहरान स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की आता केवळ ‘बोलण्याने’ परिस्थिती सुधारणार नाही.
इराणने आरोप केला आहे की अमेरिका केवळ प्रेक्षक नाही तर या हल्ल्यांचा ‘सहभागी’ आहे. परराष्ट्र मंत्री आराघची यांचं हे विधान थेट अमेरिका आणि तिचे सहयोगी देश यांच्यावर टोकाचं टीकास्त्र आहे. ज्यांच्यावर इराण अनेक वर्षांपासून प्रादेशिक अस्थिरता पसरवण्याचा आरोप करत आलं आहे.
सर्वात धोकादायक Fighter Jet सहा दिवसांपासून भारतात, जगाची नजर देशावर; गूढ वाढलं
मैदानात केवळ शस्त्र नाही
इराणकडून आलेला हा कठोर पवित्रा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा देशांतर्गत संताप आणि राष्ट्रवाद उच्चांकावर आहे. खामेनेई यांची मौनव्रती आता एका रणनीतीचा भाग मानली जात आहे. विश्लेषकांचे मत आहे की, इराण आता कोणत्याही परिस्थितीत इस्रायलला प्रत्युत्तर द्यायचं ठरवून बसलं आहे.
दरम्यान चीनचं म्हणणं आहे की- शांतता प्रस्थापित करणं ही आंतरराष्ट्रीय समुदायाची सामूहिक जबाबदारी आहे. पण प्रश्न असा आहे की, शांततेच्या हाकेला तिथं प्रतिसाद मिळेल का, जिथं चारही बाजूंनी केवळ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
