सर्वात धोकादायक Fighter Jet सहा दिवसांपासून भारतात, जगाची नजर देशावर; गूढ वाढलं, लँडिंगच्या खऱ्या कारणाने खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
F-35 Fighter Jet: ब्रिटनचं अत्याधुनिक F-35B लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे तिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करून गेल्या 6 दिवसांपासून तिथेच उभं आहे. भारताने अनेकदा मदतीचा हात पुढे केला. मात्र रॉयल नेव्हीने सर्व ऑफर्स नाकारल्याने या प्रकरणाभोवती गूढ वाढलं आहे.
तिरुवनंतपुरम: 14 जून रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या F-35B स्टील्थ लढाऊ विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, लँडिंगनंतर हे जेट अजूनही तेथेच उभं आहे. भारताने ब्रिटिश तांत्रिक टीमला जेटच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्यासाठी विमानतळाच्या हँगरमध्ये जेट हलवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र रॉयल नेव्हीने तो प्रस्ताव नाकारला. इंडियन डिफेन्स रिसर्च विंग (IDRW) ने सांगितलं की, रॉयल नेव्हीने भारताचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही.
यानंतर भारतीय हवाई दलाने पावसापासून आणि उन्हापासून जेट आणि ग्राउंड क्रूचं संरक्षण करण्यासाठी तात्पुरत्या शेडची उभारणी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु ही ऑफरही नाकारण्यात आल्याची माहिती आहे.
हे स्टील्थ जेट यूकेच्या विमानवाहू युद्धनौका HMS प्रिन्स ऑफ वेल्सवरून कार्यरत होतं. तांत्रिक कारणामुळे, विशेषतः हायड्रॉलिक सिस्टिममध्ये अडचण निर्माण झाल्यानं त्याला तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आलं. ही घटना त्या वेळी घडली जेव्हा विमान भारतीय हवाई क्षेत्राबाहेर नियमित उड्डाण करत असताना त्यात बिघाड झाला आणि त्यानंतर ते दक्षिण भारतातील विमानतळावर उतरवलं गेलं.
advertisement
सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून लँडिंगनंतर एअरक्रूला इमर्जन्सी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं. त्यांना तिरुवनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (TIAL) येथे थांबवण्यात आलं आहे. रॉयल नेव्हीच्या विनंतीनंतर एक स्थानिक ग्राउंड हँडलिंग टीमचीही व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने (IAF) आपल्या IACCS रडार नेटवर्कच्या माध्यमातून जेटचं ट्रॅकिंग केलं आणि लँडिंगला मंजुरी दिली. IAF, यूके टीमला पुन्हा उड्डाण करण्यासाठी विमान तयार करण्यात मदत करत आहे.
advertisement
लढाऊ विमानाची दुरुस्ती सुरू
लढाऊ विमानाची आपत्कालीन लँडिंग सुरक्षित झाली होती आणि याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड आहे आणि तो अद्याप दुरुस्त झालेला नाही. यामुळेच हे फाइटर जेट सुमारे सहा दिवसांपासून विमानतळावरच उभं आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, या घटनेनंतर लगेचच विमानवाहू युद्धनौकेवरील तंत्रज्ञ दुरुस्ती आणि चाचणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी सहा जण मंगळवारी दुपारी परत गेले. तर पायलटसह तीन सदस्य तिरुवनंतपुरममध्येच राहून दुरुस्तीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/देश/
सर्वात धोकादायक Fighter Jet सहा दिवसांपासून भारतात, जगाची नजर देशावर; गूढ वाढलं, लँडिंगच्या खऱ्या कारणाने खळबळ