दिल्लीला का येत होतं हे विमान?
महान एअरलाईन्सचं हे एक खासगी विमान होतं. मंगळवारी या विमानाने मसहद इथून टेकऑफ करणार होतं. मशहदहून हे विमान दिल्लीला येणार होतं. या विमानामध्ये औषधी होती, जी भारतीय लोकांनी विकत घेतली होती. या विमानाच्या मदतीने जवळपास ११ टन मदत ही तेहरानला पोहोचणार होती. पण, याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, इराणकडे असलेल्या एअरफोर्स आणि जहाजं नष्ट केली आहे. पण असं असताना एक खासगी प्रवासी वाहतूक करणारं विमान मसहद इथून टेकऑफ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकनं सैन्याला मिळाली. त्यानंतर गुप्तहेरांकडून माहिती गोळा करून अमेरिकेनं सैन्याने या विमानावर मिसाईलने हल्ला केला आणि नष्ट केलंय.
advertisement
रविवारपर्यंत इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे १६ ते १७ विमानं नष्ट झाली आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता खासगी प्रवाशी विमानांना सुद्धा टार्गेट केलं जाणार असेल तर औषधी आणि अन्नधान्य सुद्धा इराणला गोळा करावं लागणार आहे.
भारतातून लोकांची मदत
दरम्यान, इराण आणि इस्त्रायलच्या युद्धामध्ये भारतातून काही लोकांनी इराणसाठी आंदोलनं केली आणि मदत देण्यासाठी पुढेही आले. इराण दुतावासामध्ये भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे. एवढंच नाहीतर मागील आठवड्यात इराणी दुतावासाने QR कोड सुद्धा प्रसिद्ध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं हल्ला करून पाडलेलं महान एअरलाईन्सचं विमान हे इराणच्या अधिकाऱ्यांनी बूक केलं होतं. आता इराण पुन्हा एकदा दुसऱ्या कोणत्या मार्गाने विमान पाठवण्याच्या तयारीत आहे जे विमान भारतातून औषधी आणि इतर साहित्य घेऊन येईल.
