TRENDING:

Iran Warn Trump : "तुमच्याकडे फक्त २० तास, सरेंडर व्हा नाहीतर...!" इराणची ट्रम्प यांनाच उलट 'डेडलाईन', जगाचं टेन्शन वाढलं!

Last Updated:

Iran US Conflict : इराणने शरणागती पत्करावी अन्यथा गभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. मात्र, धमकीवर इराणकडूनच जोरदार पलटवार झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका अत्यंत टोकाच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणने शरणागती पत्करावी अन्यथा गभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. मात्र, धमकीवर इराणकडूनच जोरदार पलटवार झाला आहे. इराणच्या नेत्याने अमेरिकेकडेच आता २० तास शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे.
"तुमच्याकडे अवघे २० तास, सरेंडर व्हा नाहीतर...!" इराणची ट्रम्प यांनाच उलट 'डेडलाईन', जगाचं टेन्शन वाढलं!
"तुमच्याकडे अवघे २० तास, सरेंडर व्हा नाहीतर...!" इराणची ट्रम्प यांनाच उलट 'डेडलाईन', जगाचं टेन्शन वाढलं!
advertisement

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांचे मुख्य सल्लागार महदी मोहम्मदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना थेट इशारा दिला आहे. मोहम्मदी यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्याकडे आता केवळ २० तासांचा अवधी शिल्लक आहे, ज्यामध्ये त्यांनी एकतर इराणसमोर शरणागती पत्करावी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा (Allies) नाश पाहण्यास तयार राहावे.

advertisement

मोहम्मदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. इराणने हे युद्ध आधीच जिंकले आहे. आता आम्ही केवळ अशाच तहाचा किंवा अंताचा स्वीकार करू, ज्यामुळे इराणचे हित जोपासले जाईल आणि आखाती प्रदेशात एक नवीन सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित होईल."

ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'

advertisement

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) अंतिम मुदत दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही मुदत बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, जर इराणने ठरवून दिलेल्या वेळेत 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली केली नाही, तर अमेरिका आपली लष्करी कारवाई अधिक तीव्र करेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

ट्रम्प यांची डेडलाईन संपल्यानंतर अमेरिका काय पाऊल उचलते आणि इराण त्याला कसे प्रत्युत्तर देतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आखाती देशांमधील या वाढत्या तणावामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Iran Warn Trump : "तुमच्याकडे फक्त २० तास, सरेंडर व्हा नाहीतर...!" इराणची ट्रम्प यांनाच उलट 'डेडलाईन', जगाचं टेन्शन वाढलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल