TRENDING:

Iran US Conflict: इराणनं सुरक्षा कवच भेदलं? परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर अज्ञात ड्रोन्सच्या घिरट्या, व्हाईट हाऊसमध्ये खळबळ

Last Updated:

Drone At US : इराणने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अशातच अमेरिकेमध्ये एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एका संशयास्पद घटनेमुळे हादरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: इस्रायलच्या सोबतीने अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारले आहे. इराणकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे. आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले सुरू आहेत. इराणचे सर्वोच्च नेत्यांसह नेतृत्व पदांवरील नेते-अधिकारी ठार झाले आहेत. इराणने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अशातच अमेरिकेमध्ये एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एका संशयास्पद घटनेमुळे हादरली आहे.
इराणनं सुरक्षा कवच भेदलं? परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर अज्ञात ड्रोन्सच्या घिरट्या, व्हाईट हाऊसमध्ये खळबळ
इराणनं सुरक्षा कवच भेदलं? परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर अज्ञात ड्रोन्सच्या घिरट्या, व्हाईट हाऊसमध्ये खळबळ
advertisement

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ राहात असलेल्या अत्यंत सुरक्षित लष्करी तळावर अज्ञात ड्रोन्स घोंगावताना दिसले आहेत. या घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली असून जगभरातील अमेरिकन दूतावासांसाठी 'ग्लोबल सिक्युरिटी अलर्ट' जारी करण्यात आला आहे. इराणच्या ड्रोनने अमेरिकेला हतबल केले आहे. ड्रोन हल्ल्यांनी अमेरिकेचे मोठं नुकसान झालं आहे. अशातच आता महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन दिसल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

advertisement

लष्करी तळावर ड्रोनचा थरार

'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनमधील फोर्ट लेस्ले जे. मॅकनायर (Fort Lesley J. McNair) या मिलिटरी बेसच्या वर हे संशयास्पद ड्रोन्स दिसले. हे ड्रोन्स नेमके कुठून आले आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा थांगपत्ता अद्याप अमेरिकन यंत्रणांना लागलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मॅकडिल एअर फोर्स बेस आणि जॉइंट बेस मॅकगुयर-डिक्स-लेकहर्स्टवर 'सिक्युरिटी स्टेटस चार्ली' लागू करण्यात आला आहे, जो संभाव्य मोठ्या हल्ल्याचा संकेत मानला जातो.

advertisement

इराणकडून बदल्याची भीती?

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत. इराणने वारंवार अमेरिकेला 'भीषण बदल्याची' धमकी दिली आहे. त्यामुळे हे ड्रोन्स इराणने पाठवले असावेत का, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रूबियो आणि हेगसेथ यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा विचारही प्रशासनाकडून सुरू आहे.

advertisement

FBI कडून तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पेंटागनने या संवेदनशील विषयावर अधिक माहिती देण्यास नकार दिला असला तरी, FBI (Federal Bureau of Investigation) या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. अमेरिकेच्या सुरक्षा कवचात झालेल्या या संभाव्य घुसखोरीमुळे संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. इराणने आपली संपूर्ण ताकद अमेरिका आणि इस्रायलला नुकसान पोहोचवण्यासाठी लावली असल्याचे चित्र दिसत असून, ही ड्रोन घटना त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: इराणनं सुरक्षा कवच भेदलं? परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या घरावर अज्ञात ड्रोन्सच्या घिरट्या, व्हाईट हाऊसमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल