TRENDING:

Iran War: अमेरिकेच्या पोटात गोळा, इस्रायलला फुटला घाम; कोणीच कल्पना केली नव्हती इराणने एवढी तयारी केलीय

Last Updated:

US-Israel Iran War: इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स ने दावा केला आहे की अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध किमान सहा महिने तीव्र युद्ध करण्यासाठी इराण पूर्णपणे तयार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान : इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने रविवारी दावा केला की अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धासाठी ते किमान सहा महिने तीव्र लढाई करण्यास पूर्णपणे तयार आहेत. तसेच इराणकडे असलेल्या अनेक नव्या क्षेपणास्त्रांचा आणि ड्रोनचा अद्याप युद्धात वापरच करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
News18
News18
advertisement

हा इशारा अशा वेळी देण्यात आला आहे, जेव्हा Israel ने इराणवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केले आहेत. IRGC चे प्रवक्ते अली-मोहम्मद नैनी यांनी दावा केला की या संघर्षात आतापर्यंत वापरलेली बहुतेक क्षेपणास्त्रे ही 2012–2013 च्या सुमारास तयार केलेली जुनी मॉडेल आहेत. गेल्या दशकात तयार करण्यात आलेली नवी क्षेपणास्त्रे अद्याप युद्धात वापरलेली नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

त्यांच्या म्हणण्यांनुसार मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रसामग्री, रणनीती आणि तंत्रज्ञान आधीच तयार ठेवण्यात आले आहे. इराणकडे जड क्षेपणास्त्रे, बॅलिस्टिक आणि क्रूझ मिसाइल, विविध प्रकारचे मानवरहित हवाई यंत्र (UAV) तसेच हल्ला करण्यासाठीची नौदल साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

Al Jazeera च्या वृत्तानुसार नाएनी यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन युद्धासाठी आवश्यक असलेली सर्व शस्त्रे आणि रणनीती तयार आहेत. इस्लामिक रिपब्लिकचे सशस्त्र दल सध्याच्या गतीने किमान सहा महिने तीव्र युद्ध करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

advertisement

इस्रायलचे मोठे हवाई हल्ले

दरम्यान Israeli Air Force ने तेहरानसह इराणमधील अनेक ठिकाणांवरील सरकारी आणि लष्करी पायाभूत सुविधांवर “मोठ्या प्रमाणात” हवाई हल्ले केल्याची घोषणा केली. हा इराणवरील दुसरा मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी Israel Defense Forces (IDF) ने इराणच्या अंतराळ संस्थेचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. हे मुख्यालय IRGC शी संबंधित असून ते इस्रायल आणि त्याच्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच दहशतवादी कारवाया पुढे नेण्यासाठी वापरले जात होते, असे IDF ने म्हटले आहे.

advertisement

इस्रायली सैन्याने तेहरानजवळील इंधन साठवण डेपोवरही हल्ले केले. या हल्ल्यांमुळे मोठी आग लागली आणि राजधानीतील रस्त्यांलगतच्या ड्रेनेज सिस्टममधूनही ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. स्थानिक नागरिकांच्या मते या हल्ल्यांनंतर तेहरानच्या आकाशात काळ्या धुराचे ढग पसरले होते. तेल साठवण सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे रात्रीचे आकाश नारिंगी ज्वाळांनी उजळून निघाले.

युद्धात मोठी जीवितहानी

या युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत Iran मध्ये 1,230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. Lebanon मध्ये 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून Israel मध्ये सुमारे डझनभर लोकांचा जीव गेला आहे. तसेच सहा अमेरिकी सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

दरम्यान शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष Masoud Pezeshkian यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या इशाऱ्यांनंतरही इराण अमेरिकेला किंवा इस्रायलला शरण जाणार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी “निर्विवाद शरणागती” स्वीकारल्याशिवाय कोणताही करार होणार नाही, असे म्हटले असले तरी इराण आपली भूमिका बदलणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठी बातम्या/विदेश/
Iran War: अमेरिकेच्या पोटात गोळा, इस्रायलला फुटला घाम; कोणीच कल्पना केली नव्हती इराणने एवढी तयारी केलीय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल