TRENDING:

मोसादनं कसं शोधलं खामेनीला? खरंच अधिकाऱ्यांच्या दातांमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले? समोर आल्या चार थिअरी

Last Updated:

इस्रायलच्या गुप्तचरांनी खामेनींचा माग कसा काढला? तसेच त्याचा ठाव ठिकाणा इस्रायल आणि अमेरिकेला कसा मिळाला? याच्या थिअरी समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Israel Iran War:  इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला खामेनी ठार झाला. पण इस्रायलच्या गुप्तचरांनी खामेनींचा माग कसा काढला? तसेच त्याचा ठाव ठिकाणा इस्रायल आणि अमेरिकेला कसा मिळाला ? त्यासाठी कोणती क्लुप्ती वापरली ? याविषयी काही थेअरी मांडल्या जात आहेत. जगाला आचंबित करणाऱ्या या घटनाक्रमाचे तपशील हळूहळू समोर येताहेत. ज्या थिअरी समोर येताहेत तसं घडलं असेर तर मोसाद नावाची दहशत जगात अजून प्रबळ होणार यात शंका नाही.
News18
News18
advertisement

इराण निद्रीस्त असतानाचं अमेरिका आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी तेहरानवर हल्ला केला. इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला खामेनीचं कार्यालय आणि निवास्थान त्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर होते. एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र येवून थडकली. कुणाला काही कळायच्या आत तो सगळा परिसर भाजून निघाला. अवघ्या काही मिनिटात तो हाय प्रोफाईल आणि अत्यंत सुरक्षित मानला जाणाऱ्या परिसराचं अक्षरश: स्मशान झालं. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं खामेनीचा ठावठिकाणा शोधल्याचा दावा केला जात आहे.

advertisement

पहिली थेअरी काय?

पहिल्या थेअरी नुसार खामेनीला संपवण्यासाठी मोसादनं काही काळापूर्वी आपले गुप्तचर इराणमध्ये पाठवले होते. डॉक्टर बनून ते एजंट इराणमध्ये राहात होते.

त्यांनी खामेनीच्या निकटवर्तीय लष्करी अधिकाऱ्यांच्या दातांमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले होते. त्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हलचाली ट्रॅक करून मोसादनं खामेनीचा माग काढल्याचा दावा केला जात आहे.

दुसरी थेअरी काय?

advertisement

दुसऱ्या थेअरीनुसार मोसादनं इराणमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून खामेनींच्या हलचालींची माहिती मिळवण्यात आली होती. ती सगळी माहिती इस्रायलच्या तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या सर्व्हरमध्ये पाठवली जात होती. तसेच खामेनीचे अंगरक्षक आपली वाहनं कुठे पार्क करतात. याची माहिती त्या ट्रॅफिक कॅमेऱ्याच्या मदतीनं मोसादनं मिळवली होती. त्याआधारे खामेनीचा अचूक वेध घेतल्याचा दावा केला जात आहे.

advertisement

तिसरी थेअरी काय? 

तिसऱ्या थेअरी नुसार इराणमधील लोकप्रिय बाद-ए-सबा अॅप मोसादनं हॅक केलं होतं. इराण विरोधात सायकोलॉजिकल युद्ध पुकारण्यासाठी याचा वापर केला गेला. इराणी सैन्या विरोधात बंड करण्याचं आवाहन या अॅपद्वारे करण्यात आलं. तसेच 'आता हिशोब करण्याची वेळ आली आहे' असा संदेश या अॅपवरून पाठवण्यात आला होता. या अॅपचे एक कोटीहून अधिक युजर्स आहेत.

advertisement

चौथी थेअरी काय?

चौथ्या थेअरीनुसार इराणच्या लष्करात मोसादनं आपला एजंट पाठवला होता. इस्माईल कानी हा मोसादचा एजंट असल्याचं बोललं जातंय. तो इराणच्या लष्करात कमांडर पदावर कार्यरत आहे. खामेनीवरील हल्ल्यापूर्वी इस्माईल कानीनं खामेनीची भेट घेतली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: आले, शेवग्याला उठाव, लिंबूनंही खाल्ला भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

खरं तर मोसादनं यापूर्वी अनेक अशक्य ऑपरेशन शक्य करुन दाखवले आहेत. खामेनीचा खात्मा करुन मोसादनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

मराठी बातम्या/विदेश/
मोसादनं कसं शोधलं खामेनीला? खरंच अधिकाऱ्यांच्या दातांमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले? समोर आल्या चार थिअरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल