TRENDING:

Israel-Iran conflict: इस्रायल-इराण युद्धाची धग भारताला! पेट्रोल डिझेल महाग होणार? शेअर मार्केटमध्ये दबाव

Last Updated:

Israel-Iran conflict: इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातही दबाव आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Israel-Iran conflict: इस्रायल- इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली. बॉम्बर विमानांनी हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खळबळ उडाली. इतकंच नाही तर आर्थिक गणितंही बिघडण्याची भीती आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव आहे आणि याचे परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसू लागले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या आहेत. भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातही दबाव असून, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
News18
News18
advertisement

ब्रेंट क्रूडच्या किमतीत एकाच दिवसात ५.७ टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली. सकाळच्या सत्रातही २.६ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार होत होता. भारत हे जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक असल्याने, आंतरराष्ट्रीय तेलदरात होणारी प्रत्येक वाढ थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका देते. त्यामुळे या आठवड्यात पेट्रोल-डिझेलसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

अमेरिकेच्या हल्ल्यात मोठा ट्विस्ट, ट्रम्पचा वार फुसका; इराणने 2 दिवसांपूर्वीच गेम केला, 16 मालवाहक ट्रकचे गुपित समोर

advertisement

इतकंच नाही तर गॅस देखील दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका स्वयंपाक घरापासून ते अगदी प्रवास करणाऱ्या ऑटो रिक्षा, कार, टॅक्सीवरही होणार आहे. या युद्धामुळे होर्मुझ जलमार्गावर दबावही वाढला आहे. या मार्गावरून 20% कच्च्या तेलाचे व्यापार केले जातात. इराणकडून जर हा जलमार्ग काही काळ बंद ठेवला, तर पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. याचा सर्वात मोठा फटका आयातदार देशांना, विशेषतः भारतासारख्या विकासशील देशांना बसेल.

advertisement

या घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारातही घसरणीचा कल पाहायला मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असून, सोन्याच्या किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया दबावात असल्याने, आयात खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. क्रूड कंपन्यांचे शेअर, वाहनांचे शेअर्स, सध्या दबावात आहेत. डिफेन्स शेअर्सवरही विशेष लक्ष राहणार आहे.

अमेरिकेच्या हल्ल्याचा जगाला झटका, इराणचा भयानक निर्णय; Strait of Hormuz बंद, आता होणार महागाईचा महास्फोट

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

विश्लेषकांच्या मते, जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं, तर भारतात केवळ इंधन दरच नव्हे तर खाद्यपदार्थ, वाहतूक आणि घरगुती खर्चही महाग होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारने दरवाढ टाळण्यासाठी सवलतीचं धोरण स्वीकारलं असलं, तरी इंधन कंपन्यांवरचा ताण वाढत आहे. इस्रायल-इराण संघर्ष भारतासाठी केवळ भू-राजकीय प्रश्न नाही, तर घरखर्च आणि महागाई वाढवणारा आर्थिक धोका ठरू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Israel-Iran conflict: इस्रायल-इराण युद्धाची धग भारताला! पेट्रोल डिझेल महाग होणार? शेअर मार्केटमध्ये दबाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल