अमेरिकेच्या हल्ल्यात मोठा ट्विस्ट, ट्रम्पचा वार फुसका; इराणने 2 दिवसांपूर्वीच गेम केला, 16 मालवाहक ट्रकचे गुपित समोर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel Iran Tension: अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुउद्योग केंद्रांवर हवाई हल्ले करत युद्धात उघड उडी घेतली आहे. हल्ल्याआधी फोर्डो परिसरात 16 मालवाहू ट्रक दिसल्याने इराणने गुपचूप तयारी केली होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तेहरान: इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे आणि आता अमेरिकेनेदेखील या संघर्षात उघडपणे सहभाग घेतला आहे. रविवारी सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुउद्योग केंद्रांवर – फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथे हवाई हल्ले केले आहेत.
हल्ल्याआधी दिसले ‘16 मालवाहू ट्रक’
दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. फोर्डो अणुउद्योग केंद्रावर हल्ला होण्याच्या दोन दिवस आधीच त्या परिसरात 16 मालवाहक ट्रक दिसून आले होते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये फोर्डो प्लांटजवळ असामान्य हालचाल दिसून आली होती. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की, इराणने हल्ल्याआधी आवश्यक उपकरणे व सामग्री स्थलांतरित केली होती का?
advertisement
19 जूनच्या प्रतिमांमध्ये प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्यावर 16 ट्रक उभे दिसले. दुसऱ्या दिवशी या ट्रकला एक किलोमीटर लांब हलवले गेले होते. शिवाय प्लांटच्या गेटजवळ ट्रक व बुलडोजर दिसून आले. एक ट्रक तर थेट गेटला लागून उभा होता. इराणकडून याबाबत कोणतीही अधिकृत दुजोरा दिला गेला नाही.
IAEA ची आपत्कालीन बैठक
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी सोमवारी तातडीने बैठक बोलवली आहे. त्यांनी एक्स वर म्हटले की, सध्याची स्थिती अत्यंत गंभीर असून यावर चर्चा करणे अत्यावश्यक झाले आहे.
advertisement
ओमानचा अमेरिकेच्या हल्ल्याला विरोध
view commentsइराण-अमेरिका अणुकरारासाठी मध्यस्थी करत असलेल्या ओमानने अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले की, इराणवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. यामुळे आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो आणि या कारवाईचा स्पष्ट विरोध करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 7:10 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेच्या हल्ल्यात मोठा ट्विस्ट, ट्रम्पचा वार फुसका; इराणने 2 दिवसांपूर्वीच गेम केला, 16 मालवाहक ट्रकचे गुपित समोर


