अमेरिकेच्या हल्ल्याचा जगाला झटका, इराणचा भयानक निर्णय; Strait of Hormuz बंद, आता होणार महागाईचा महास्फोट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
US Attack on Iran Strait of hormuz Closed:अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने स्फोटक निर्णय घेत स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. जगातील एक तृतीयांश समुद्री तेलवाहतूक जिथून होते तो मार्ग बंद झाल्यास जागतिक इंधनसंकट उद्भवू शकते.
तेहरान: अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला केला असून त्यानंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीच स्फोटक झाली आहे. अशातच इराणने एक मोठी घोषणा केली आहे. इराणच्या संसदेनं धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होर्मूज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ला बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयानंतर इतर देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.
हा तोच मार्ग आहे ज्याद्वारे जगातील जवळपास एक तृतीयांश समुद्री तेल व्यापार होतो. हा निर्णय रविवारी इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केला. त्यानंतर जागतिक तेल बाजारात आणि सामरिक स्तरावर हालचाली वाढल्या आहेत.
‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’चं महत्त्व काय आहे?
स्ट्रेट ऑफ होर्मूज ही फारसच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारी सामुद्रधुनी आहे. जगातील सर्वात वर्दळीच्या आणि संवेदनशील तेलवाहतूक मार्गांपैकी ही एक आहे. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, यूएई आणि कतारसारख्या देशांचा बहुतांश तेल निर्यात याच मार्गातून होते.
advertisement
स्ट्रेट ऑफ होर्मूज हे जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. हा मार्ग सुमारे 96 मैल लांब असून सर्वात अरुंद भागात त्याची रुंदी फक्त 21 मैल आहे. या जलमार्गात दोन्ही बाजूंनी केवळ दोन-दोन मैलांचे शिपिंग लेन आहेत. ज्या इराण कधीही बंद करू शकतो. हा मार्ग बंद करण्याच्या निर्णयानंतर हे निश्चित मानलं जात आहे की कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी झपाट्याने वाढ होईल, कारण जहाजांच्या वाहतुकीत अडथळे येतील आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढेल.
advertisement
अंतिम निर्णय सुरक्षा परिषदेचा: जनरल कोवसरी
इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य मेजर जनरल कोवसरी यांनी राज्य माध्यमांशी बोलताना सांगितले, होर्मूज सामुद्रधुनी बंद करण्याच्या बाजूने एकमत आहे. मात्र अंतिम निर्णय इराणची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेईल. ही परिषद देशातील सर्वोच्च सुरक्षा संस्था असून अंतिम लष्करी आणि कूटनीतिक निर्णय याच संस्थेमार्फत घेतले जातात.
advertisement
संघर्ष आता आर्थिक युद्धाच्या दिशेने?
view commentsहोर्मूज सामुद्रधुनी बंद करणे ही केवळ भौगोलिक कृती नसून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी एक मोठा आर्थिक धक्का ठरू शकतो. या पावलामुळे तेल पुरवठा, समुद्री व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारतासारख्या देशांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, जे आपला बहुतांश तेल पश्चिम आशियातून आयात करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेच्या हल्ल्याचा जगाला झटका, इराणचा भयानक निर्णय; Strait of Hormuz बंद, आता होणार महागाईचा महास्फोट


