हे आंदोलन अमेरिकेत सुरू असलेल्या Anti-ICE (Immigration and Customs Enforcement) विरोधी लाटेचाच भाग आहे. हे आंदोलन आता अधिक व्यापक होत असून त्याची धग देशभरातील अनेक शहरांत पोहोचली आहे. अनेक आंदोलक ICE च्या धोरणांप्रती आणि प्रवाशांसोबत होणाऱ्या वागणुकीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी आग लावण्याचे प्रकारही केले आहेत. परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही आणि पुढे ती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
राजच्या आईने असं काही सांगितले जे कोणालाच माहिती नाही, राजाच्या अंत्यविधीनंतर...
4,100 अतिरिक्त गार्ड तैनात
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 हजार अतिरिक्त नेशनल गार्ड सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता शहरात तैनात करण्यात आलेल्या सैनिकांची एकूण संख्या 4,100 पेक्षा अधिक झाली आहे. हे पाऊल संघीय मालमत्तेची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेसाठीउचलण्यात आले आहे. यापूर्वी पेंटागॉनने सुमारे 700 मरीनची तैनाती केली होती, जे संघीय मालमत्तेच्या सुरक्षेत मदत करतील.
गव्हर्नर न्यूजॉम यांचा विरोध
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजॉम यांनी या तैनातीचा निषेध करताना या कृतीला अवैध आणि विक्षिप्त म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकन मरीनना आपल्या देशातील नागरिकांविरोधात उभं करणं हा हुकुमशाहीपणा आहे. कॅलिफोर्नियाने ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. यामध्ये न्यायाधीशाकडे मागणी करण्यात आली आहे की लॉस एंजेलसमधील आंदोलनाच्या प्रतिसादात झालेल्या नॅशनल गार्ड तैनातीला बेकायदेशीर ठरवावे आणि भविष्यात अशा कोणत्याही तैनातीला प्रतिबंध करावा.
स्थानीय प्रशासनाचा आक्षेप
बॉर्डर अधिकारी टॉम होमन यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आंदोलन शांत करण्यासाठी मरीनची तैनाती गरजेची होती. मात्र कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गैविन न्यूजॉम आणि लॉस एंजेलसच्या महापौर करेन बास यांनी या निर्णयाची टीका केली आहे. मेयर बास म्हणाल्या की, शहराचा वापर संघीय शक्तीच्या प्रयोगासाठी केला जात आहे.
लॉस एंजेलसमध्ये उद्रेक
आपल्याला लक्षात असेलच की लॉस एंजेलिस हे कॅलिफोर्निया राज्यात आहे. ज्याच्या सीमा मेक्सिकोशी लागून आहेत. मेक्सिकोमार्फत मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी येथे पोहोचतात. याच कारणामुळे जेव्हा छापेमारी करण्यात आली, तेव्हा मोठा गोंधळ उडाला. एक्स वरून दंगलीसंबंधित अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की कशा प्रकारे अराजकता पसरली आहे. दंगल विरोधी गियर घातलेल्या एजंटांनी जमाव हटवताना फ्लॅश-बँग ग्रेनेड्सचा वापर केल्याचंही स्पष्टपणे पाहायला मिळतं.
सध्याची स्थिती अजूनही अस्थिर असून आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघराज्य आणि राज्य सरकारमध्ये या मुद्द्यावरून तणाव वाढला असून कायदेशीर संघर्ष आता सुरू झाला आहे.
