राजच्या आईने असं काही सांगितले जे कोणालाच माहिती नाही, राजाच्या अंत्यविधीनंतर घरी परतल्यावर...

Last Updated:

Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मुख्य आरोपी राज कुशवाह निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे. सोनमने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. मेघालय पोलिस SIT तपास करत आहेत.

News18
News18
इंदूर: ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशीच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या राज कुशवाह याच्या आईने मोठा दावा केला आहे. तिचा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असे तिने ठामपणे सांगितले. राजा रघुवंशीची पत्नी सोनम हिने कथित प्रियकर राज कुशवाहच्या मदतीने मेघालयात तीन सुपारीबाज गुन्हेगारांना बोलावून पतीची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी राज कुशवाहसह अन्य चार जणांना मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशमधून अटक केली.
दरम्यान, राज कुशवाहची आई चुन्नी देवी त्याला अटक केल्यापासून सतत रडत आहे. 'पीटीआय'शी बोलताना त्या म्हणाल्या, माझा मुलगा निरपराध आहे. त्याला फसवण्यात आले आहे. 20 वर्षांचा मुलगा एवढं मोठं पाऊल कसं काय उचलू शकतो? वडिलांच्या निधनानंतर घर चालवणारा तो एकटाच आहे. राजा रघुवंशीच्या अंत्यविधीनंतर घरी परतल्यावर राज खूप रडला होता आणि तिने त्याला समजावले होते.
advertisement
कुशवाह सध्या सोनमच्या कुटुंबाच्या सनमायका शीट व्यवसायात लेखापाल म्हणून काम करत होता. तो 12वी नापास असून त्याचा परिवार मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या इंदूरच्या एका भाड्याच्या घरात राहतो. राजची बहिण सुहानी हिनेही आपल्या भावावर लावलेले आरोप फेटाळून लावत सोनम आणि माझ्या भावाचे नातं फक्त मालक-नोकऱ्या इतकेच आहे. ते एकमेकांना 'भैया' आणि 'दीदी' म्हणतात, असे सांगितले.
advertisement
स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, राजने स्वतः मेघालयात न जाता इंदूरमध्येच राहून हत्येची योजना आखली होती. इतकेच नव्हे तर अंत्यविधीत सोनमच्या वडिलांना आधार देताना तो व्हिडीओमध्येही दिसतो आहे. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी आपल्या मुलीचे निर्दोष असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
मेघालय पोलिसांनी सांगितले की, सोनम व राजा 23 मे रोजी बेपत्ता झाले होते. 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह चेरापुंजीजवळील एका खोल दरीत आढळून आला. राजा आणि सोनम यांचा विवाह 11 मे रोजी इंदूरमध्ये झाला होता आणि 20 मे रोजी ते मेघालयला हनिमूनसाठी गेले होते.
advertisement
राजाच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी नोंद नाही. राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची चौकशी सध्या मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
राजच्या आईने असं काही सांगितले जे कोणालाच माहिती नाही, राजाच्या अंत्यविधीनंतर घरी परतल्यावर...
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement