पृथ्वीभोवती 360 चीनी उपग्रह
चीनचं लष्करी अंतराळ कार्यक्रम 2010 मध्ये केवळ 36 उपग्रहांपासून सुरू झालं होतं. जे 2024 मध्ये 1000 च्या पुढं गेलं आहे. यामध्ये 360 हून अधिक ISR मिशनसाठी – म्हणजेच इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉनिसन्ससाठी उपग्रह वापरले जात आहेत. एप्रिल 2024 मध्ये चीनने ‘ऑटोनॉमस एअरोस्पेस फोर्स’ची स्थापना केली असून. ही फोर्स थेट चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनला रिपोर्ट करत आहे.
advertisement
अमेरिकेचा मोठा गेम झाला, चीनचा महास्कॅम पाहून पायाखालची जमीन सरकली; गुपित...
एअर मार्शल दीक्षित यांच्या मते, चीनच्या उपग्रहांनी अलीकडे LEO – म्हणजेच लो अर्थ ऑर्बिटमध्ये “डॉगफाइटिंग” युद्धसराव केला आहे. हा सराव शत्रू राष्ट्रांच्या उपग्रहांचा मागोवा घेण्यासाठी आणि संभाव्यरित्या त्यांना जॅम करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. चीनने आता त्याच्या ISR सॅटेलाइट्सना शस्त्र प्रणालींशी देखील जोडले आहे.
भारताचीही प्रगत तयारी
चीनने अंतराळात डॉगफाइट ड्रिल केली, तर भारतही मागे नाही. ISRO ने SPADEX (Space Docking Experiment) मिशनद्वारे दोन भारतीय उपग्रहांना 29,000 किमी/तास या वेगात समोरासमोर फिरवून एक अकल्पनीय प्रयोग केला. या मिशनचा उद्देश उपग्रहांमध्ये ऑटोमेटिक डॉकिंग आणि अनडॉकिंग प्रक्रियेचं परीक्षण करणं होता. हे मिशन आधीच यशस्वी झालं होतं. वैज्ञानिकांनी त्याच वेळी एक अधिक गुंतागुंतीचा प्रयोग पूर्ण केला – 29,000 किमी/तास वेगाने उडणाऱ्या दोन्ही उपग्रहांना एकमेकांच्या खूप जवळ आणून त्यांची दिशा बदलली. हाच प्रकार फायटर जेट्सच्या डॉगफाइटमध्ये घडतो. पण इथे तो स्पेसमध्ये जेटच्या वेगाच्या तब्बल 28 पट वेगात झाला.
राफेल, ब्रह्मोस, F-35, SU-30MKI पेक्षा खतरनाक, चीन-पाक बेचैन; जग चक्रावून गेलं
भारताने आधीच 'मिशन शक्ती' अंतर्गत एंटी-सॅटेलाइट (ASAT) चा यशस्वी प्रयोग केला होता. या तंत्रज्ञानाद्वारे भारताने शत्रू राष्ट्रांचा कोणताही उपग्रह पाडण्याची क्षमता मिळवली आहे. भारताने जमिनीवरून 300 किमी उंचीवर असलेल्या आपल्या उपग्रहाला स्वदेशी बनावटीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे यशस्वीरित्या नष्ट केलं होतं.