राफेल, ब्रह्मोस, F-35, SU-30MKI पेक्षा खतरनाक, चीन-पाक बेचैन; भारताच्या नव्या प्रोजेक्टने संपूर्ण जग चक्रावून गेलं

Last Updated:

Fighter Jet Project: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान, चीन आणि तुर्कीसह त्यांच्या समर्थकांना जोरदार इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने 6th जनरेशन फायटर जेट विकसित करण्याच्या दिशेने झेप घेतली असून, हे जगात मोजक्या देशांकडे असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान ठरणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली: पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करत अतिरेक्यांसोबतच पाकिस्तान, चीन आणि तुर्कस्तानसारख्या समर्थक देशांनाही स्पष्ट संदेश दिला आहे. भारताकडून मॉडर्न वॉरफेअरचे असं प्रदर्शन करण्यात आलं की शत्रूच नव्हे तर संपूर्ण जग चक्रावून गेलं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आता ब्रह्मोसचं भय दिवसाढवळ्या जाणवू लागलं आहे. भारतीय हवाई दलाने अतिरेक्यांना असा धडा शिकवला की पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर हे फील्ड मार्शल म्हणून बढती मिळूनही मुख्यालय हलवण्याचा विचार करू लागले आहेत.
दरम्यान भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. Advanced Medium Combat Aircraft (AMCA) प्रोग्राम अंतर्गत दोन फायटर जेट विकसित करण्यात येत आहेत. AMCA मार्क-1 आणि AMCA मार्क-2. मार्क-1 हे विद्यमान जेट्समधील कमतरता भरून काढतील. तर मार्क-2 मध्ये 6th Generation तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, मार्क-2 पूर्णपणे देशी तंत्रज्ञानावर आधारित असेल. भारताच्या या पावलामुळे शत्रू देशांची झोप उडणं निश्चित आहे.
advertisement
सध्या इंडियन एअरफोर्स 4.5 जनरेशन (चौथी व पाचवी पिढी यामधील) फायटर जेट्स जसे की राफेल आणि Su-30MKI यांच्यावर अवलंबून आहे. चीनने पाचव्या पिढीचा स्टेल्थ फायटर J-20 सीमारेषेवर तैनात केला आहे. त्यामुळे अल्ट्रा मॉडर्न फायटर जेट्सची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. रिपोर्टनुसार ऑपरेशन सिंदूरनंतर घाबरलेला चीन आता पाकिस्तानला 5th जनरेशनचे फायटर जेट देण्यासाठी पुढे सरसावत आहे.
advertisement
भारताला सध्या 42–43 स्क्वाड्रन (प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 18 ते 24 फायटर जेट्स) ची गरज आहे. तर केवळ 30 स्क्वाड्रन उपलब्ध आहेत. म्हणजेच भारताला 200 ते 300 फायटर जेट्सची तातडीने गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन AMCA प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. हे फायटर जेट्स अमेरिकन कंपनी General Electric (GE) च्या F414 इंजिनसह येतील. मात्र या इंजिनच्या डिलिव्हरीस विलंब झाल्यामुळे प्रोजेक्ट एक वर्ष उशीराने सुरू झाला आहे. दुसरीकडे मार्क-2 मध्ये देशी तंत्रज्ञानावर आधारित इंजिन वापरण्याची शक्यता आहे आणि अनेक कंपन्या या करारासाठी शर्यतीत आहेत.
advertisement
मार्क-2 म्हणजे 6th Generation विमानाचा मार्ग
AMCA मार्क-2 च्या अंतर्गत भारत पाचव्या पिढीचा फायटर जेट तयार करणार असून त्यात सहाव्या पिढीच्या तंत्रज्ञानाचाही समावेश केला जाईल. त्यामुळे अमेरिका, चीन आणि रशियानंतर सहाव्या पिढीचं फायटर जेट तयार करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचं नाव झळकणार आहे.
महत्त्वाचे फरक
मार्क-1 फायटर जेट GE कंपनीच्या इंजिनवर आधारित असतील तर मार्क-2 मध्ये DRDO अंतर्गत GTRE (Gas Turbine Research Establishment) देशी इंजिन विकसित करणार आहे.
advertisement
120 kN इंजिन
मार्क-2 साठी DRDO चं GTRE देशी 120 kN क्षमतेचं 6th Generation सक्षम इंजिन विकसित करेल. Rolls Royce, Safran किंवा General Electric यांच्यासोबत करार होण्याची शक्यता आहे. 100 kN इंजिन जवळपास 22,500 पाउंड फोर्स निर्माण करतं, त्यामुळे 120 kN इंजिनची ताकद आणि क्षमता अधिक प्रचंड असेल. यातून 30% जास्त रेंज आणि 20% अधिक अ‍ॅक्सलेरेशन मिळू शकतं. त्यामुळे या जेट्सच्या गती आणि मारक क्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे.
advertisement
6th Generation तंत्रज्ञान
फायटर जेटमध्ये इंजिनशिवाय अनेक आधुनिक वैशिष्ट्येही असतील. सर्वात खास म्हणजे AI आधारित कॉम्बॅट सिस्टम जे या फायटर जेटला अधिक घातक आणि सक्षम बनवेल. यामध्ये ऑप्शनली मॅन्ड टेक्नोलॉजी असेल म्हणजे मानवाचा हस्तक्षेप कमी होईल आणि ड्रोन कंट्रोल करण्याची क्षमता देखील यात असेल. एकच पायलट अनेक कामं पार पाडू शकेल.
advertisement
स्टेल्थ पॉवर
मार्क-2 मध्ये स्टेल्थ क्षमता अधिक प्रगत असेल. रडारला चकवणं सहज शक्य होईल. यामध्ये अपग्रेडेड मटेरियल, कटिंग एज सेन्सर फ्युजन सिस्टम, ऑप्टिमाईज्ड एअरफ्लो आणि 110 kN इंजिनसारखी वैशिष्ट्ये असतील. सुपरसोनिक टेक्नोलॉजीदेखील यात समाविष्ट केली जाईल. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारात छाप बसणार असून नवीन निर्यात बाजारही खुला होईल आणि मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होईल.
मराठी बातम्या/देश/
राफेल, ब्रह्मोस, F-35, SU-30MKI पेक्षा खतरनाक, चीन-पाक बेचैन; भारताच्या नव्या प्रोजेक्टने संपूर्ण जग चक्रावून गेलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement