बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींना कलातच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र एधी फाउंडेशनच्या बचाव अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की जखमींची संख्या 10 वर पोहोचली आहे आणि अनेक जणांना उपचारासाठी क्वेटाच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
advertisement
पाकिस्तानात ‘जय श्रीराम’चा जयघोष! कराचीत LIVE रामायण पाहून प्रेक्षक भावूक
रिंद यांनी सांगितले की हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दल, जिल्हा प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी संपूर्ण भागाला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिंद यांनी हे देखील स्पष्ट केले की मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस व अन्य कायदा अंमलबजावणी संस्थांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
दहशतवादी दबा धरून बसले होते आणि मग त्यांनी हल्ला केला. त्यांनी आधी बस थांबवली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार केला. हल्लेखोरांची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या गोळीबाराचा तीव्र शब्दांत निषेध केला असून अधिकाऱ्यांना जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. डॉनच्या माहितीनुसार राष्ट्रपती झरदारी यांनी म्हटले आहे की, निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे ही क्रूरता आहे. दहशतवादी हे मानवतेचे आणि शांततेचे शत्रू आहेत आणि ते देशातील स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.
