पाकिस्तानात ‘जय श्रीराम’चा जयघोष! कराचीत LIVE रामायण पाहून प्रेक्षक भावूक, टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही

Last Updated:

Ramayan In Pakistan: पाकिस्तानातील कराचीत एका थिएटर ग्रुपने 'रामायण' नाट्य सादर करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मुस्लिम बहुल देशात हिंदू धर्मकथेचे भावनिक सादरीकरण पाहून प्रेक्षक भावूक झाले आणि टाळ्यांनी सभागृह दुमदुमून गेलं.

News18
News18
कराची : तुम्ही कल्पना करू शकता का, की ज्या देशात बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत – अशा पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध कथा ‘रामायण’ इतक्या प्रेमाने आणि सन्मानाने रंगमंचावर सादर केली जाईल की? इतके नाही तर प्रेक्षक टाळ्या वाजवणं थांबवूच शकणार नाहीत? वाचण्यास आणि ऐकण्यास थोड विचित्र वाटेल पण कराचीमध्ये हे खरोखर घडलं आहे.
कराचीतील एक थरारक अनुभव
पाकिस्तानच्या कराची शहरातील ‘मौज’ या थिएटर ग्रुपने हा हृदयस्पर्शी आणि मोठा निर्णय घेतला. योगेश्वर करेरा यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. करेरा म्हणाले, रामायणने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. ही फक्त एका धर्माची कथा नाही. तर ती चांगल्याच्या विजयाची आणि प्रेमाच्या शक्तीची गोष्ट आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ही कथा रंगमंचावर सादर करताना त्यांना कधीच कोणाच्या नाराज होण्याची भीती वाटली नाही.
advertisement
रामायणचं रंगमंचावर आगमन कसं झालं खास?
हे नाटक प्रथम नोव्हेंबर 2023 मध्ये कराचीतील The Second Floor (T2F) येथे सादर करण्यात आले होते. यावर्षी जुलै 2024 मध्ये हे नाटक Pakistan Art Council मध्ये अधिक मोठ्या स्तरावर सादर करण्यात आले. नाटकात काहीही भव्य किंवा अतिशय महागडं नसलं तरी प्रत्येक प्रसंगात खोल भावनिक परिणाम होता. सादगीतच याचं सौंदर्य लपलेलं होतं.
advertisement
AI वापरून साकारली रामायणाची दुनिया
या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे AI (Artificial Intelligence) चा वापर. मंचावरील लाईटिंग, लाईव्ह म्युझिक, रंगीबेरंगी वेशभूषा यांसोबतच AI चा वापर करून असं वातावरण निर्माण करण्यात आलं की, प्रेक्षक रामायणाच्या काळात असल्याचा भास झाला. झाडांच्या पानांची हालचाल, राजाचा भव्य महाल, दृश्यानुसार सतत बदलणारा सेट – हे सगळं AI द्वारे साकारण्यात आलं. नाटकात प्रत्यक्ष झाडं किंवा महाल नव्हते. पण ते इतके खरे वाटत होते की, क्षणभरासाठी सगळं वास्तव वाटू लागलं.
advertisement
जादू प्रेक्षकांच्या मनात उतरली
‘सीता’ची भूमिका राना काझमी यांनी साकारली आणि त्यांच्या शांततेत, सामर्थ्यात आणि भावनिकतेत प्रेक्षक गुंतून गेले. ‘राम’ साकारणारे अश्मल लालवानी यांच्या गंभीर अभिनयाने उपस्थितांचं मन जिंकलं. रावणची भूमिका सम्हान गाझी यांनी केली आणि त्यांचा रोखठोक आवाज, रागीटपणा, आणि अष्टपैलू शैलीमुळे प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने रावणाला अनुभवले.
राजा दशरथ (आमिर अली), लक्ष्मण (वकास अख्तर), हनुमान (जिब्रान खान) आणि राणी कैकेयी (सना तोहा) यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.
advertisement
टाळ्या वाजवत राहिला कराची, डोळे झाले पाणावले
नाटक संपताच संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. काही प्रेक्षकांना विश्वासच बसत नव्हता की, त्यांनी पाकिस्तानमध्ये एवढ्या प्रेमाने ‘रामायण’ पाहिलं.
राणा काझमी यांचं मत
राणा काझमी यांनी सांगितलं, जेव्हा आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. तेव्हा त्याचा चांगल्या पद्धतीने वापर का करू नये? आम्हाला प्रत्येक दृश्य जिवंत करायचं होतं आणि AI मुळे ते शक्य झालं.
advertisement
एक संदेश जो सीमारेषा ओलांडतो
या अनुभवाने हे स्पष्ट केलं की, कला कधीही धर्म किंवा राष्ट्र पाहत नाही. ती मानवतेची गोष्ट सांगते. कराचीतील या रामायण सादरीकरणाने सर्व सीमारेषा मिटवून दिल्या आणि प्रेम, श्रद्धा व सर्जनशीलतेचा एक जीवंत अनुभव प्रेक्षकांना दिला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानात ‘जय श्रीराम’चा जयघोष! कराचीत LIVE रामायण पाहून प्रेक्षक भावूक, टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement