रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अटकेच्या भीतीने भारतात जी२० परिषदेत उपस्थित राहिले नसल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने त्यांच्या अटकेचं वॉरंट जारी केलं आहे. ते जर रशियातून बाहेर पडले असते तर त्यांना अटक केली गेली असती. मात्र रशियाने हे वॉरंट मान्य नसल्याचं म्हटलंय. आयसीसीने पुतीन यांच्याविरोधात युक्रेनच्या मुलांना बेकायदेशीरपणे निर्वासित केल्याबद्दल युद्ध गुन्हा केल्याच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केलं होतं.
advertisement
Italy : भारतात येताच इटलीचा चीनला दणका, जिनपिंग यांचा BRI प्रोजेक्ट संकटात
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखतीत सांगितलं की, पुढच्या वर्षी रिओमध्ये जी२० परिषद होणार आहे. मला वाटतं की पुतीन यांना अटक केली जाणार नाही. ते सहज ब्राझीलला येऊ शकतील. आम्ही शांतताप्रिय आहोत आणि लोकांसोबत चांगला व्यवहार करायला आम्हाला आवडतं. मी ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष आहे आणि मला वाटतं की रशियन राष्ट्राध्यक्ष आले तर असा कोणताच मार्ग नाही ज्यामुळे त्यांना अटक होईल. मी पुतीन यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पुढच्या वर्षी ब्रिक्स परिषद रशियात असेल आणि मी त्यात सहभागी होण्यासाठी रशियाला जाईन.
