'चिकन नेक' म्हणून ओळखला जाणारा हा कॉरिडॉर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो ईशान्येकडील राज्यांना देशाशी जोडतो. बांगलादेशचे काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताच्या विरोधात केलेल्या तीव्र विधानांमुळे या परिस्थितीत अधिक भर पडली आहे. युनूस यांचे सरकार चीन आणि पाकिस्तानसोबत मैत्री वाढवत असल्याने भारताची चिंता अधिकच वाढली आहे.
भारताचा महाभयंकर पलटवार, नूर खान एअरबेसची राखरांगोळी; गुप्त छायाचित्रे जगासमोर
advertisement
लष्करी ताकद वाढवली
वाढता धोका लक्षात घेता भारताने सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये आपली लष्करी ताकद वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने या परिसरात लष्करी सराव केला होता. आता अशा बातम्या येत आहेत की रशियन बनावटीची एस-400 ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टिम येथे तैनात करण्यात आली आहे. जी 400 किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत अनेक हवाई धोके एकाच वेळी नष्ट करू शकते.
सर्व Missileचा बाप, देश नव्हे पृथ्वी 100 वेळा नष्ट होईल; अमेरिकेचे धाबे दणाणले
यासोबतच हाशिमारा हवाई तळावर राफेल फायटर जेटची एक स्क्वाड्रन तैनात करण्यात आली आहे. जी मेटिओर क्षेपणास्त्रे आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींनी सुसज्ज आहे. ब्रह्मोस क्रूझ मिसाईल रेजिमेंट आणि आकाश मिसाईल सिस्टिम देखील या क्षेत्रात तैनात आहेत. ज्या कोणत्याही धोक्याला त्वरित प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.
बांगलादेशच्या हालचालींमुळे चिंता
गेल्या वर्षी बांगलादेशच्या बायक्तर टीबी2 ड्रोनने भारत-बांगलादेश सीमेच्या जवळ उड्डाण केल्याने भारताला अधिक सतर्क केले आहे. भारतीय लष्कराने इशारा दिला आहे की, कोणतेही विमान किंवा ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात घुसल्यास ते तात्काळ नष्ट केले जाईल. बांगलादेशने तुर्कीकडून 12 टीबी2 ड्रोन खरेदी केले आहेत आणि आता ते पाकिस्तान-चीन निर्मित जेएफ-17 थंडर फायटर जेट्स खरेदी करण्याची योजना आखत आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.