भारताचा महाभयंकर पलटवार, नूर खान एअरबेसची राखरांगोळी; ती गुप्त छायाचित्रे अखेर जगासमोर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Noor Khan Airbase: भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या नूर खान एअरबेससह 9 ते 11 हवाई दल तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानने युद्धविरामाचे आवाहन केले. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पुरावे सादर केले.
नवी दिल्ली/इस्लामाबाद: पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसची (Noor Khan Airbase) नवीन छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यामुळे भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे किती मोठे नुकसान झाले, याचा अंदाज येतो. भारताने ज्या ठिकाणी हल्ला केला होता त्याच्या जवळील संपूर्ण कॉम्प्लेक्स पाकिस्तानने उद्ध्वस्त केले आहे. यामुळे भारताच्या हल्ल्यात नूर खान एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, हे निश्चित होते. पाकिस्तान एअर फोर्सचा नूर खान तळ पंजाब प्रांतातील रावळपिंडीजवळ चकलाला येथे आहे. हा एअरबेस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
हल्ल्यात मोठे नुकसान
हल्ल्यानंतरच्या लीक झालेल्या दस्तऐवजात भारतीय हल्ल्यात नष्ट झालेल्या सर्व सुविधा त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यात उपकरणे, डिजिटल सिस्टिम्स आणि ऑपरेशनल क्षमता त्वरित पूर्ववत करण्याची चर्चा आहे. अहवालातून असे दिसून येते की, नूर खान एअरबेसवरून 24 स्क्वॉड्रन "ब्लाइंडर्स" द्वारे चालवल्या जाणाऱ्या एलिट DA-20 इलेक्ट्रॉनिक कॉम्बॅट जेटला गंभीर नुकसान झाले होते. हे विमान रडार जॅमिंग (Radar Jamming) आणि इलेक्ट्रॉनिक युद्धात (Electronic Warfare) विशेष भूमिका बजावते. AW-139 हेलिकॉप्टरसह अनेक मौल्यवान विमानांचेही नुकसान झाले आहे.
advertisement
भारताने लक्ष्य केले
रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस व्यतिरिक्त, भारताने सरगोधा येथील मुशर्रफ एअरबेस (Musharraf Airbase), कामरा येथील मिन्हास एअरबेस (Minhas Airbase), कराची येथील फैसल एअरबेस (Faisal Airbase), लोधरान येथील एमएम आलम एअरबेस (M. M. Alam Airbase), कराची येथील मसरूर एअरबेस (Masroor Airbase), इस्लामाबाद एअरबेस (Islamabad Airbase) आणि अगदी इस्लामाबादमधील पाकिस्तान एअर फोर्स (PAF) मुख्यालयासह त्याच्या सेंट्रल कमांड सेंटरलाही (Central Command Centre) मोठे नुकसान पोहोचवले होते.
advertisement
भारताचा कडक पलटवार
22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांवर घातक हल्ला केला होता. ज्यात 26 नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि नंतर लोकांना ठार केले. मृतांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक होते. या हृदयद्रावक घटनेनंतर भारतीय लष्कराने 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. लष्कराच्या या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात मसूद अझरच्या लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि हाफिज सईदच्या जमात-उद-दावाच्या (Jamaat-ud-Dawa) दहशतवादी छावण्यांचाही समावेश होता.
advertisement
A review of Nur Khan Airbase, Pakistan reveals the entire complex near India's strike location has now been demolished, suggesting the strike’s effect went beyond the two special-purpose trucks - possibly presenting a broader footprint of the damage @TheIntelLab #SkyFi pic.twitter.com/gUhqG3nemL
— Damien Symon (@detresfa_) May 25, 2025
advertisement
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली परंतु आकाशतीर (Akash Teer) आणि एस-400 (S-400) सारख्या भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी त्यांना हवेतच नष्ट केले. यानंतर भारताने कठोर पलटवार करत पाकिस्तानचे 9 ते 11 हवाई दल तळ (Air Force Bases) उद्ध्वस्त केले. या कठोर लष्करी कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याने युद्धविरामाचे (Ceasefire) आवाहन केले. पाकिस्तानी डीजीएमओने (DGMO) भारतीय समकक्षाशी संपर्क साधून तणाव संपवण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्यावर दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली. भारताने आपल्या लष्करी कारवाईचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सादर केले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की भारताची प्रत्युत्तरादाखल कारवाई केवळ आत्मसंरक्षण नव्हती. तर दहशतवादी तळांना मुळापासून संपवण्याच्या निर्णायक धोरणाचा एक भाग होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
भारताचा महाभयंकर पलटवार, नूर खान एअरबेसची राखरांगोळी; ती गुप्त छायाचित्रे अखेर जगासमोर