पहाटे 3 वाजता कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या; आता सर्व गप्प राहिले, तर आणखी रक्तपात होईल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistan News: पाकिस्तानमध्ये बलुच पत्रकार अब्दुल लतीफ बलुच यांची कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आंतरराष्ट्रीय हस्तक्षेकाची मागणी केली आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत बलुच पत्रकार अब्दुल लतीफ बलुच यांची त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मशके येथे घडली आहे.
न्यूज एजन्सी ANI च्या वृत्तानुसार, 'बलुच याकजेहती कमिटी' (BYC) या स्थानिक मानवाधिकार गटाने या हत्येची पुष्टी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजता काही सशस्त्र हल्लेखोरांनी लतीफ यांच्यावर त्यांच्या घरात, कुटुंबासमोर हल्ला केला. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकार उल्लंघन आणि लष्करी कारवायांवर अब्दुल लतीफ बलुच हे निर्भीडपणे पत्रकारिता करत होते. त्यामुळे तेथील लोकांमध्ये ते अत्यंत आदराने ओळखले जात होते. ते सक्तीने गायब करणे, बेकायदेशीर हत्या आणि सामान्य बलुच नागरिकांच्या संघर्षाबद्दल सातत्याने लिहित होते. त्यांच्या मृत्यूने पाकिस्तानमध्ये पत्रकारांना किती धोका आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
advertisement
'किल अँड डंप' धोरणाचा बळी?
अब्दुल लतीफ बलुच यांची हत्या अशा वेळी झाली आहे. जेव्हा काही महिन्यांपूर्वी त्यांचे पुत्र सैफ बलुच आणि कुटुंबातील इतर सात सदस्यांना सुरक्षा दलांनी अपहरण केले होते. नंतर ते सर्व मृत अवस्थेत आढळले होते. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या 'किल अँड डंप' (Kill and Dump) धोरणांतर्गत असे केले जात आहे. या धोरणाचा अर्थ असा आहे की, विरोध करणाऱ्यांना मारून टाकणे आणि त्यांना शांत करणे. बलुच ओळख दडपण्यासाठी हे असे केले जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय हस्तक्षेकाची मागणी
'बलुच वुमेन फोरम'च्या शाले बलुच यांनी या हत्येला बलुच लोकांविरुद्धच्या 'सिस्टिमॅटिक व्हायोलन्स' (Systematic Violence) चा भाग म्हटले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संघटना आणि माध्यमांना यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. जर जग गप्प राहिले, तर आणखी रक्तपात होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मानवाधिकार गट आणि प्रेस स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या संघटनांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. ते पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, बलुचिस्तानमध्ये सातत्याने मानवाधिकार उल्लंघन होत आहे. लोकांना सक्तीने गायब केले जात आहे, बेकायदेशीरपणे मारले जात आहे आणि विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. 'सिस्टिमॅटिक व्हायोलन्स' म्हणजे एका विशिष्ट गटाला किंवा समुदायाला लक्ष्य करून योजनाबद्ध पद्धतीने हिंसा करणे. 'किल अँड डंप' धोरणाचा अर्थ लोकांना मारून कुठेही फेकून देणे, जेणेकरून सरकारने किंवा सुरक्षा दलांनी काय केले हे कोणाला कळणार नाही.
advertisement
BYC ही एक मानवाधिकार संघटना असून, ती लोकांच्या हक्कांसाठी काम करते. बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनांबद्दल माहिती गोळा करून ती जगासमोर आणण्याचे काम ही संघटना करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2025 6:06 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पहाटे 3 वाजता कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या; आता सर्व गप्प राहिले, तर आणखी रक्तपात होईल