TRENDING:

Russia Plane Crash: टेकऑफनंतर रडारशी संपर्क तुटला, 29 लोकांचा मृत्यू, रशियन सैन्याच्या विमानाचा भीषण अपघात

Last Updated:

क्रिमिया बेटावर रशियन अँटोनोव्ह २६ लष्करी मालवाहू विमान कोसळून ६ क्रू आणि २३ प्रवाशांसह २९ जणांचा मृत्यू, तांत्रिक बिघाडाची शक्यता, चौकशी सुरू

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रशियाच्या संरक्षण दलाला बुधवारी एक मोठा धक्का बसला. रशियाचं अँटोनोव्ह-२६ हे लष्करी मालवाहू विमान क्रिमिया बेटावर कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील ६ क्रू मेंबर्स आणि २३ प्रवासी अशा एकूण २९ जणांचा मृत्यू झाला असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
विमानाचा भीषण अपघात
विमानाचा भीषण अपघात
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास हे विमान क्रिमियाच्या आकाशात असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच शोध आणि बचाव पथक कामाला लागलं. काही तासांतच बचाव पथकाला विमानाचा ढिगारा सापडला, मात्र दुर्दैवाने विमानात असलेल्या कोणालाही वाचवण्यात यश आलं नाही.

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असल्यामुळे या विमानावर शत्रू राष्ट्राने हल्ला केला का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, विमानाचे अवशेष पाहता त्यावर कोणताही हल्ला झाला नाही. तर विमानातील तांत्रिक बिघाडामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे.

advertisement

An-26 विमानाचा इतिहास

ज्या विमानाचा अपघात झाला, ते 'अँटोनोव्ह-२६' मॉडेल रशियाच्या ताफ्यातील जुनं आणि विश्वासार्ह मानलं जाणारं विमान आहे. या विमानांची निर्मिती १९६९ ते १९८६ या काळात युक्रेन येथील कारखान्यात करण्यात आली होती. रशियाने आतापर्यंत अशी एकूण १३९८ विमानं तयार केली असून ती हंगेरीपासून क्युबापर्यंत अनेक देशांना विकली आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

मालवाहू आणि लष्करी वाहतुकीसाठी या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रशियाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ऐन युद्धाच्या काळात २९ अनुभवी जवानांचा मृत्यू झाल्याने रशियन लष्कराचे मोठे नुकसान मानले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Russia Plane Crash: टेकऑफनंतर रडारशी संपर्क तुटला, 29 लोकांचा मृत्यू, रशियन सैन्याच्या विमानाचा भीषण अपघात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल