चाघी हा तोच परिसर आहे जो बलुचिस्तानमधील ड्युरंड लाइनजवळ (Durand Line) वसलेला आहे. याच ड्युरंड लाइनला अफगाण तालिबानने आता 'अवैध' घोषित केले आहे. याच ठिकाणाहून अफगाण सैनिकांनी पाकिस्तानात घुसखोरी केल्याची खात्री झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. मात्र पाकिस्तानकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
advertisement
पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक, महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई
तालिबानचा क्वेटा-पेशावरवर दावा आणि सीमा तणाव
अफगाणिस्तानची तालिबान सरकार आता ड्युरंड लाइन स्वीकारण्यास तयार नाही. त्यांनी केवळ सीमा 'अवैध' असल्याचे म्हटले नाही तर क्वेटा आणि पेशावरसारख्या पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवरही दावा ठोकला आहे. तालिबानचा आरोप आहे की- पाकिस्तानचे सैन्य वारंवार त्यांच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. या आरोपाला उत्तर देताना पाकिस्तानने म्हटले आहे की, तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) एकत्र येऊन पाकिस्तानी सैन्य आणि चौक्यांवर हल्ला करत आहेत. दोन्ही देशांमधील विश्वासाची दोरी आता जवळपास तुटली आहे असे दिसते.
पाकिस्तानवर दुहेरी हल्ला
आंतरिकदृष्ट्या पाकिस्तान आधीच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि TTP सारख्या दहशतवादी संघटनांशी झगडत आहे. रोजच लष्करी तळ आणि तांड्यांवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत अफगाण सैन्याकडून सीमा ओलांडून घुसखोरी आणि गोळीबारामुळे पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध आधीच तणावपूर्ण होते. परंतु तालिबान सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमधील सहकार्याची आशा पूर्णपणे मावळली आहे.
पूर्वीच्या चकमकी आणि पाण्याची कोंडी
डिसेंबर 2024 मध्ये खोस्त आणि पक्तिया येथे झालेल्या सीमावर्ती चकमकींमध्ये 19 पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. आता चाघीची घटना त्याच मालिकेतील पुढील कडी मानली जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये अफगाणिस्तान आता पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा थांबवण्याची योजना आखत असल्याचीही बातमी आहे. जर हे पाऊल उचलले गेले तर पाकिस्तानचे अनेक सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प ठप्प पडू शकतात. ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
