Breaking: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक, महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई

Last Updated:

Maharashtra ATS: महाराष्ट्र पोलिसांच्या ATS विभागाने ठाणे जिल्ह्यात गुरुवारी गुप्तचर कारवायांच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. या संशयितास दोन इतर व्यक्तींसह ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

News18
News18
ठाणे: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातून एका व्यक्तीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे युनिटने या संशयितास दोन इतर व्यक्तींसह ताब्यात घेतले. त्यानंतर दोन व्यक्तींना चौकशीनंतर सोडण्यात आले, तर मुख्य आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली.
ATS च्या माहितीनुसार, अटक केलेला व्यक्ती पाकिस्तान इंटेलिजन्स ऑफिस (PIO) साठी काम करत होता आणि भारतातील महत्त्वाची गुप्त माहिती इस्लामाबादला पुरवत होता. हा आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत कार्यरत होता. त्याला फेसबुकवर एका महिलेसारखी प्रोफाईल तयार करून पाकिस्तानच्या एजंटने ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
advertisement
Youtuber ज्योती मल्होत्राचे अनेक व्हिडिओ आहेत, वकिलांनी सर्व काही सांगितले
या व्यक्तीने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गुप्तचर ऑपरेटिव्हला संवेदनशील माहिती दिल्याचे उघड झाले आहे. ही माहिती मुंबईतील एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या केंद्राशी संबंधित होती.
प्राथमिक चौकशीनंतर या आरोपीला अधिकृत गोपनीयता कायदा (Official Secrets Act) च्या कलम ३ अंतर्गत (गुप्तचर कारवाया) आणि भारतीय न्याय संहितेच्या (Bharatiya Nyaya Sanhita) कलम 61(2) (फौजदारी कट रचना) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
advertisement
पाकिस्तानसाठी हेरगिरी आणखी एक प्रकरण
ही घटना भारतात पाकिस्तानसाठी गुप्तचर काम करणाऱ्यांच्या मालिकेतील आणखी एक प्रकरण ठरले आहे. याआधीही काही भारतीय नागरिकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थानातील CRPF जवान मोतीराम जाट, गुजरातमधील कच्छ सीमेवर तैनात असलेला आरोग्य कर्मचारी साहदेवसिंह गोहिल आणि हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा यांचा समावेश आहे. ज्योती मल्होत्राने पाकिस्तानला अनेक वेळा भेट दिली होती. तिला याच महिन्यात अटक करण्यात आली होती.
advertisement
त्याचप्रमाणे आजच राजस्थानातील जैसलमेरमध्ये एक सरकारी कर्मचारी शकूर खान याला अटक करण्यात आली. तो माजी काँग्रेस मंत्री शाले मोहम्मद यांचा सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानशी संबंधित दूरध्वनी क्रमांक सापडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
संबंध अधिकच तणावपूर्ण
एप्रिल 22 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांचा बळी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्या उत्तरादाखल भारताने 7 आणि 8 मेच्या दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
advertisement
या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी हेरगिरीविरोधात अधिक तीव्र मोहीम उघडली असून देशातील संवेदनशील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Breaking: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक, महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement