नवा ट्विस्ट! Youtuber ज्योती मल्होत्राचे अनेक व्हिडिओ आहेत, वकिलांनी सर्व काही सांगितले; तर वडील म्हणाले...

Last Updated:

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिसारच्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. मात्र ज्योतीने स्वतःला निर्दोष म्हटले असून तिचे वकील आणि वडिलांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

News18
News18
हिसार: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिसार येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. मात्र ज्योती मल्होत्राने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. ज्योतीचे वकील कुमार मुकेश यांनी ही माहिती दिली असून पोलिसांच्या तपासात काय समोर आले आहे. हे आरोपपत्र दाखल झाल्यावरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना कुमार मुकेश यांनी सांगितले की, ज्योती मल्होत्राने मला काल (गुरुवारी) वकील म्हणून नियुक्त केले आहे. तिने काल वकालतनामा साईन केला आहे. जो मी कोर्टात सादर केला आहे. मी काही कागदपत्रे मागितली आहेत. ती कायद्यानुसार मिळतील.
आतापर्यंतची अपडेट:
कुमार मुकेश यांनी परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले की, आतापर्यंत सर्व काही लोकांसमोर आहे. पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला, अटक केली आणि रिमांडवर पाठवले. ज्योतीचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तसेच तिचे बँक स्टेटमेंटही तपासले जात आहे. या सर्वांच्या अभ्यासानंतरच काही अधिक माहिती दिली जाईल.
advertisement
ते पुढे म्हणाले, पोलिसांच्या तक्रारीवरून 16 मे रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले आणि पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. 26 मे रोजी तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.
वकिलांचे स्पष्टीकरण
ज्योती मल्होत्राला पैसे मिळाल्याच्या प्रश्नावर वकिलांनी म्हटले की, ती ब्लॉगर असल्यामुळे पैसे तर येणारच. प्रश्न हा आहे की हे पैसे कुठून आले? जर हे पैसे आयएसआय (ISI) किंवा पाकिस्तानी एजंट्सकडून आले असतील, तर ती वेगळी बाब आहे. पण जर ते इतर कुठून आले असतील तर ते स्वाभाविक आहे. कुठूनही प्रायोजकत्व मिळू शकते. पैसे कुठून आले, हे पोलीसच तपासात स्पष्ट करतील.
advertisement
पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्राला सुरक्षा मिळाल्याच्या मुद्द्यावर वकील म्हणाले, ज्योती मल्होत्राचे अनेक व्हिडिओ आहेत. पण दोन्ही बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. सुरक्षा कोणालाही मिळू शकते. ती ब्लॉगर असल्यामुळे तिलाही सुरक्षा मिळू शकते.
वडिलांचा दावा
या सर्व घडामोडींदरम्यान ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा यांनी गुरुवारी (28 मे) दावा केला की ज्योतीने स्वतःला निर्दोष सांगितले आहे. मात्र त्यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला. हिसारच्या सेंट्रल जेल नंबर 2 मध्ये ज्योती मल्होत्राची भेट घेतल्यानंतर हरीश मल्होत्रा भावूक दिसले.
मराठी बातम्या/देश/
नवा ट्विस्ट! Youtuber ज्योती मल्होत्राचे अनेक व्हिडिओ आहेत, वकिलांनी सर्व काही सांगितले; तर वडील म्हणाले...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement