भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार पाकव्याप्त भागात दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्धवस्त केली. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पण पाकिस्तान आकडेवारी सांगण्याची हिंमत दाखवत नाही. अशातच ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. एका ट्रॅक्टरमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन आले होते. यावेळी दहशतवाद्यांच्या मृतदेहाला पाकिस्तानी जवान खांदा देत असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
मृतामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरमधील दहशतवाद्यांचा समावेश होता. कमांडर अब्दुल रऊफ सुद्धा होता. त्याच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. हात जोडून त्यांनी दु:ख व्यक्त केलं.
मसूद अझहर रडला
दरम्यान,दहशतवादी मसूद अझहरचं कुटुंब आणि अझहरची मोठी बहीण असे परिवारातील १४ जण ठार झाल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यात तर मसूद अझहर बचावला असून त्याची एक पत्रक जारी करत माझा या हल्ल्यात मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं, असे म्हणत ढसाढसा रडला आहे.
पाकिस्तानच्या बहावलपूरध्ये झालेल्या हल्ल्यात जैश ए मोहममदचा म्होरक्या मसूज अजहरच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. एवढच नाही तर त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य या हल्ल्यात ठार झाले आहे. भारतीय सेनेने पंजाब आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करत ते उद्धवस्त केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील ४ आणि पाकव्याप्त काश्मिरमधील पाच ठिकाणांवर हल्ला करण्यात येणार आहे.