TRENDING:

Donald Trump On Iran Attack: कतार गॅस फिल्डवरील इराणच्या हल्ल्याने ट्रम्प हादरले, ''आमचा संबंध नाही, पण....''

Last Updated:

Donald Trump : इराणच्या या 'जसास तसे' या भूमिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले. मात्र, त्याच वेळी त्यांनी इराणला इशारा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाने आज २०व्या दिवसात प्रवेश केला आहे. इराणने बुधवारी रात्री कतारमधील सर्वात मोठ्या 'रास लफान' गॅस प्लांटवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलनं इराणच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणने कतारच्या गॅस फिल्डला लक्ष्य केले. अमेरिकन लष्कराचे तळ आखात देशात असल्याने इराणकडून त्यावर हल्ले करण्यात येत आहेत. इराणच्या या 'जसास तसे' या भूमिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले. मात्र, त्याच वेळी त्यांनी इराणला इशारा दिला आहे.
कतार गॅस फिल्डवरील इराणच्या हल्ल्याने ट्रम्प हादरले, ''आमचा संबंध नाही, पण....''
कतार गॅस फिल्डवरील इराणच्या हल्ल्याने ट्रम्प हादरले, ''आमचा संबंध नाही, पण....''
advertisement

इराणच्या साऊथ पार्स गॅस क्षेत्रावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले की, "या हल्ल्यात अमेरिकेची किंवा कतारची कोणतीही भूमिका नव्हती. मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे संतापलेल्या इस्रायलने हा हल्ला केला आहे. वॉशिंग्टनला (अमेरिका) या हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती." तसेच, या हल्ल्यात गॅस प्लांटच्या एका छोट्या भागालाच लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले.

advertisement

ट्रम्प यांचा इराणला इशारा...

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत इराणला सुनावले आहे. ट्रम्प म्हणाले, "मला या स्तरावरील हिंसाचार किंवा विनाश मान्य करायला (Authorize) आवडणार नाही, कारण याचा इराणच्या भविष्यावर अतिशय वाईट परिणाम होईल. मात्र, जर कतारच्या एलएनजी सुविधांना पुन्हा लक्ष्य केले गेले, तर मी कठोर पाऊल उचलण्यास संकोच करणार नाही." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत ताकीद दिली असून, जर इराणने कतारच्या नैसर्गिक वायू (LNG) प्रकल्पांवर पुन्हा हल्ला केला, तर अमेरिका इराणचे 'साऊथ पार्स' हे जगातील सर्वात मोठे गॅस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करेल, असा इशारा दिला आहे.

advertisement

तर इस्रायलही हल्ले करणार नाही...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, जोपर्यंत इराण कतारवर पुन्हा हल्ला करत नाही, तोपर्यंत इस्रायल गॅस क्षेत्रावर कोणतेही नवीन हल्ले करणार नाही. मात्र, इराणच्या एका चुकीच्या पावलामुळे संपूर्ण आखात युद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump On Iran Attack: कतार गॅस फिल्डवरील इराणच्या हल्ल्याने ट्रम्प हादरले, ''आमचा संबंध नाही, पण....''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल