TRENDING:

Ukraine Attacks: रशियाच्या घरात 2000 KM आत घुसून हल्ला, युक्रेनने सायबेरियात थरकाप उडवला; गुप्त अणुबॉम्ब तळांना उडवले

Last Updated:

Ukraine Drone Attacks: युक्रेनने रशियाच्या अंतर्गत चार प्रमुख एअरबेसवर ड्रोन हल्ले करत युद्धाला धक्कादायक वळण दिलं आहे. 'स्पायडरवेब' या गुप्त ऑपरेशनखाली करण्यात आलेल्या या हल्ल्यांमुळे रशियन वायुदलाचे 40हून अधिक विमानं उद्ध्वस्त झाली असून अब्जोंचं नुकसान झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मॉस्को: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता एक नवे वळण घेतले आहे. यावेळी युक्रेनने थेट रशियाच्या अंतर्गत भागात घुसून एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक ड्रोन हल्ला केला. 'स्पायडरवेब' (Spiderweb) या खास गुप्त ऑपरेशनअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार प्रमुख हवाई तळांवर एकाचवेळी हल्ले चढवले. बेलाया, डायगिलेवो, ओलेन्या आणि इवानोवो हे रशियाचे महत्त्वाचे एयरबेस यामध्ये सामील होते. जेथे अणुबॉम्ब वाहून नेणारी अत्याधुनिक विमाने तैनात होती.
News18
News18
advertisement

AI-ड्रोनचा वापर, 40 विमाने जमीनदोस्त

युक्रेनी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात TU-95, TU-22M3 आणि AEW प्रणालीसह अत्याधुनिक A-50 प्रकारची विमानं उद्ध्वस्त करण्यात आली. जवळपास 40 रशियन लष्करी विमाने एका झटक्यात निष्क्रिय झाली. हे ड्रोन हल्ले रशियाच्या आत तयार करण्यात आलेल्या ट्रकवरून लाँच करण्यात आले होते. या ट्रकला स्थानिक भागातील लाकडी केबिनमध्ये लपवण्यात आले होते. विशेष म्हणजे या ड्रोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली बसवण्यात आली होती. जी लक्ष्य ओळखून आपोआप त्यावर झेप घेत हल्ला करत होती.

advertisement

advertisement

18 महिन्यांची गुप्त तयारी, सायबेरियातही हल्ला

‘एसबीयू’ या युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने या ऑपरेशनसाठी तब्बल 18 महिन्यांहून अधिक काळ गुप्त तयारी केली होती. हे ऑपरेशन रशियासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं सामरिक नुकसानकारक ठरले आहे. विशेष म्हणजे यावेळी युक्रेनने रशियाच्या सायबेरिया भागातही (यूक्रेनच्या सीमा रेषेपासून सुमारे २००० किमी अंतरावर) हल्ला केला आहे. ही बाब जागतिक पातळीवर खळबळजनक मानली जात आहे.

advertisement

युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला, संपूर्ण रशियात खळबळ; 40 हून अधिक Aircraft उद्ध्वस्त

2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान

युक्रेनने असा दावा केला आहे की या हल्ल्यामुळे रशियन वायुसेनेला 2 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झालं आहे. रशियन अधिकाऱ्यांनी मुरमांस्क आणि सेवेरोमोस्क भागात झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. मात्र रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया देत सांगितले की सर्व हवाई हल्ले निष्फळ ठरवण्यात आले आहेत.

advertisement

जगासाठी धडा

सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात रशियन ठिकाणांवरून काळा धूर उठताना आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं दिसत आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण जगासमोर हे स्पष्ट झालं आहे की आता युद्ध रणांगणात नव्हे तर तांत्रिक बुद्धिमत्तेत जिंकले जात आहे आणि यावेळी बाजी मारली आहे ती युक्रेनने!

मराठी बातम्या/विदेश/
Ukraine Attacks: रशियाच्या घरात 2000 KM आत घुसून हल्ला, युक्रेनने सायबेरियात थरकाप उडवला; गुप्त अणुबॉम्ब तळांना उडवले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल