युक्रेनचा रशियावर इतिहासातली सर्वात मोठा हल्ला, संपूर्ण देशात खळबळ; 40 हून अधिक Aircraft उद्ध्वस्त
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ukraine-Russia War: युक्रेन-रशिया युद्धाने आता हवाई आघाडीवर भीषण वळण घेतलं आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला करत त्याच्या युद्धशक्तीला जोरदार धक्का दिला आहे.
कीव: युक्रेन-रशिया युद्ध आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचले असून युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे, असा दावा युक्रेनी माध्यमांनी केला आहे. या हल्ल्यात रशियाचे 40 पेक्षा अधिक युद्धक विमाने नुकसानीसाठी लक्ष्य ठरली असून त्यात अत्याधुनिक A-50, TU-95 आणि TU-22M3 विमानांचाही समावेश आहे.
रशियाच्या हवाई ताकदीवर थेट घाव
युक्रेनी सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला अत्यंत रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा होता आणि त्यामागील प्रमुख हेतू रशियाच्या हवाई शक्तीला कमकुवत करणे हा होता. हा हल्ला रशियाच्या विविध लष्करी विमानतळांवर करण्यात आला. मात्र रशियाने अद्याप या हल्ल्यामुळे एवढ्या मोठ्या नुकसानीची औपचारिक पुष्टी दिलेली नाही. मात्र त्यांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
रशियाची 'इस्कांडर-M' मिसाइलने प्रतिहल्ला
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी युक्रेनच्या खार्कोव्ह प्रदेशात 'इस्कांडर-M' क्षेपणास्त्राने हल्ला करून 6 ड्रोन लॉन्चर आणि सुमारे 30 मानवरहित हवाई वाहनं (UAV) नष्ट केली आहेत. त्याचबरोबर ड्रोन हल्ल्यांचे स्रोत देखील निष्क्रिय केल्याचा दावा केला आहे.
advertisement
पहिल्यांदाच ड्रोन हल्ला
या संपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साइबेरियामधील इरकुत्स्क भागात पहिल्यांदाच ड्रोन हल्ला नोंदवला गेला आहे. या हल्ल्यात एक सैन्य तळ लक्ष्य करण्यात आला असून स्थानिक गव्हर्नरने याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की लष्कर आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
शांती वाटाघाटीपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तीव्रतेचा स्फोट
दरम्यान शांती वाटाघाटी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन सीमेजवळील रशियन भागांतील दोन महत्त्वाचे पूल देखील उडवण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला असून 69 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला असून जमीनस्तरावरील स्थिती अत्यंत स्फोटक आणि संवेदनशील बनली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2025 7:06 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
युक्रेनचा रशियावर इतिहासातली सर्वात मोठा हल्ला, संपूर्ण देशात खळबळ; 40 हून अधिक Aircraft उद्ध्वस्त