रिपोर्टनुसार दोन वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की इस्रायलने खामेनेईंना लक्ष्य करण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला होता. मात्र ट्रम्प यांनी हा विचार नाकारला आणि विचारले की, इराणने अजूनपर्यंत एखाद्या अमेरिकन व्यक्तीला मारले आहे का? नाही. मग जोपर्यंत ते तसे करत नाहीत. तोपर्यंत आपण त्यांच्या राजकीय नेतृत्वाला लक्ष्य करण्याबद्दल विचारही करणार नाही.
advertisement
इस्रायली हल्ल्यांनी तेहरानला पूर आला, घरे बुडू लागली, सर्वत्र अराजकता पसरली
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांचा हा दावा फेटाळला आहे. ट्रम्प यांचे हे विधान एका वरिष्ठ अमेरिकी प्रशासनिक अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिले आहे. हे विधान अशा काळात समोर आले आहे, जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्रतेच्या टोकावर पोहोचला आहे आणि अलीकडेच दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर ट्रम्प यांनी त्या वेळी इस्रायली योजनेला संमती दिली असती. तर पश्चिम आशियात परिस्थिती हाताबाहेर गेली असती आणि मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली असती. अयातुल्ला खामेनेई हे इराणच्या राजकीय आणि लष्करी निर्णयांचे सर्वोच्च केंद्र आहेत. आणि त्यांच्यावर हल्ला म्हणजे देशाच्या अस्मितेवर थेट आघात मानला जातो.
जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेने एका मोठ्या ऑपरेशनमध्ये इराणी कमांडर कासिम सुलेमानी यांना बगदादमध्ये ठार केले होते. ज्यामुळे अमेरिका-इराण संबंधांमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर अमेरिकेने अशा कोणत्याही हाय-प्रोफाइल लक्ष्यांपासून दूर राहण्याचे धोरण स्वीकारले होते. आता इराण आणि इस्रायल पुन्हा एकदा थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले असताना, ट्रम्प यांचा हा निर्णय आणि विधान जागतिक मुत्सद्देगिरीच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
