Israel Iran War: इस्रायली हल्ल्यांनी तेहरानला पूर आला, घरे बुडू लागली, सर्वत्र अराजकता पसरली; बॉम्बपेक्षा धोकादायक दुर्गंधी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel Iran War: इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या सीवेज संकटामुळे तेहरान शहर सध्या अराजकता पसरली आहे. रस्त्यांवर सांडपाणी वाहत असून नागरिकांना दुर्गंधी, रोगराई आणि दैनंदिन जीवनातील अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
तेहरान: इराणची राजधानी तेहरान सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एका बाजूला इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला राजधानीच्या रस्त्यांवर साचलेले गटारातील सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्नामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलीकडे झालेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे केवळ सैन्य तळांनाच नुकसान झाले नाही. तर त्याचा परिणाम तेहरानच्या जमिनीखाली असलेल्या सांडपाणी आणि जलपुरवठा पाइपलाइन्सवरही झाला आहे.
स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानीतील अनेक भागांत सीवरच्या पाइपलाइन फुटल्या असून त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले आहे आणि काही ठिकाणी बुडबुडलेल्या पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
टायमर सुरू झाला आहे, एकही मूल जन्माला न आलं तर?; वैज्ञानिकांनी दिलं भयावह उत्तर
तेहरानमधील रहिवासी सध्या रस्ते पार करण्यासाठी विटा, लाकडी फळ्या किंवा तात्पुरते पूल वापरत आहेत. काही दुकानांमध्ये सांडपाणी शिरल्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे. काही घरांमध्ये बाथरूममधून पाणी उलटे वाहू लागले असून त्यामुळे लोकांना आपली घरे सोडून बाहेरच तात्पुरती निवासस्थाने शोधावी लागत आहेत.
advertisement
इराणच्या स्थानिक प्रशासनाने मान्य केले आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील मूलभूत सुविधा गंभीरपणे बाधित झाल्या आहेत. पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यासाठी अभियंता पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र सततचे सुरक्षा अलर्ट आणि सायरनच्या आवाजात काम करणे मोठे आव्हान बनले आहे.
इस्रायलने टाकले भयानक पाऊल,जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड उद्ध्वस्त; भारतावर संकट
तेहरानमधील एका स्थानिक नागरिकाने सांगितले, आम्ही आधी बॉम्बस्फोटांपासून घाबरत होतो. आता दुर्गंधी आणि आजारांचे धोके यामुळे अधिक भीती वाटते.
advertisement
डॉक्टरांनी इशारा दिला आहे की जर लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले नाही. तर डेंग्यू आणि इतर आजार पसरू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा घटना युद्धाच्या ‘लपलेल्या किंमती’ असतात. खरी हानी केवळ सैन्य तळांपुरती मर्यादित राहत नाही. तर सामान्य नागरिकांचे रोजचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
तेहरान सध्या मोठ्या संकटात आहे आणि जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत लोकांना प्रत्येक दिवस भीती आणि अडचणींमध्ये काढावा लागत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 11:07 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran War: इस्रायली हल्ल्यांनी तेहरानला पूर आला, घरे बुडू लागली, सर्वत्र अराजकता पसरली; बॉम्बपेक्षा धोकादायक दुर्गंधी