इस्रायलने टाकले भयानक पाऊल,जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड उद्ध्वस्त; भारतावर संकट, तुमच्या घरातील गॅस संपणार?

Last Updated:

Israel-Iran War Latest News: इस्रायलने इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर थेट हल्ला करून संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. हा गॅस फील्ड जगातील सर्वात मोठा असून त्याचा फटका आता थेट भारतातील घराघरांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

News18
News18
तेहरान: इस्रायलने इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर (South Pars Gas Field) हल्ला करून ती उडवून दिली आहे. ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी गॅस फील्ड असून, इथून अनेक देशांना गॅस पुरवठा केला जातो. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने येथून गॅसचा पुरवठा थांबवला आहे. या घटनेचा परिणाम कतारवरही होणार हे निश्चित आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की याचा भारतावर काय परिणाम होणार? भारतात येणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यावर याचा काही परिणाम होईल का? आणि तुमच्या घरातील चुला बंद पडणार का?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, इस्रायलने ज्या गॅस फील्डवर हल्ला केला आहे, ती गॅस फील्ड इराण आणि कतार यांनी संयुक्तरित्या वापरात आणलेली आहे. कतारमध्ये यालाच नॉर्थ फील्ड (North Field) असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला भारत थेट या क्षेत्रातून गॅस खरेदी करत नाही. परंतु त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे.
साउथ पार्समधून गॅसला LNG (Liquified Natural Gas) मध्ये रूपांतरित करून इतर देशांना निर्यात केले जाते. आणि यामध्ये कतार एक प्रमुख देश आहे. भारत थेट इराणकडून या क्षेत्रातून गॅस घेत नसला तरी तो कतारकडून LNG स्वरूपात गॅस खरेदी करतो. कारण साउथ पार्स आणि नॉर्थ फील्ड हे एकच गॅस केंद्रात आहे. त्यामुळे या क्षेत्रावर जर परिणाम झाला तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. मात्र भारताने यासाठी आधीपासूनच काही प्रमाणात तयारी केली आहे.
advertisement
भारताचा या गॅस फील्डशी असलेला संबंध
2000 च्या दशकात भारताची सरकारी कंपनी ओएनजीसी विदेशने इराणच्या Farsi Block मध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. जो साउथ फार्सचा भाग मानला जातो. मात्र अमेरिकेचे निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे या प्रकल्पांमध्ये प्रगती होऊ शकली नाही. याच दरम्यान आणखी एक मोठी योजना होती IPI गॅस पाइपलाइन, जिच्यामार्फत इराणहून पाकिस्तानमार्गे भारतात गॅस आणण्याची योजना होती. पण भारताने सुरक्षा आणि भूराजकीय परिस्थितीमुळे या योजनेतून माघार घेतली.
advertisement
दुसऱ्या प्रकारे परिणाम
इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी तेलाच्या किंमतींमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली होती. तेलाच्या किंमती सात टक्क्यांनी वाढून ७३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. सततच्या हल्ल्यांमुळे तेलाच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होणे निश्चित मानले जात आहे. तज्ज्ञांना याचीही भीती आहे की दक्षिण आशिया सहित संपूर्ण जगभर तेल व गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या/विदेश/
इस्रायलने टाकले भयानक पाऊल,जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड उद्ध्वस्त; भारतावर संकट, तुमच्या घरातील गॅस संपणार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement