इस्रायल हादरले, संपूर्ण देश भीतीच्या छायेत; इराणने भेदले जगातील सर्वात सुरक्षित सुरक्षा कवच, अविश्वसनीय S-500ला धूळ चारली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel-Iran War Latest News: महिन्याभराच्या तयारीनंतर इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी तेहरानने क्षेपणास्त्र हल्ला करून इस्रायलमध्ये विनाशही घडवून आणला आहे.
तेल अवीव: पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या धगेत सापडले आहे. इस्रायलने इराणवर थेट हवाई हल्ला करत तेहरानमधील ठिकाणांवर बॉम्बवर्षाव केला आहे. इस्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की या हल्ल्यात इराणची अनेक अणुशक्ती केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच इराणचे लष्करप्रमुख आणि काही अणुशास्त्रज्ञ देखील ठार झाले आहेत.
या हल्ल्यानंतर इराणने युद्धाची अधिकृत घोषणा केली असून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला आहे. या प्रतिहल्ल्यात इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या दोन्ही देश एकमेकांवर सतत क्षेपणास्त्र डागत आहेत.
या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की इस्रायलकडे अत्याधुनिक 'आयरन डोम' हवाई संरक्षण प्रणाली असतानाही इराणचे क्षेपणास्त्र इस्रायलमध्ये एवढी मोठी हानी कशी करू शकले? इराणने जी क्षेपणास्त्रे वापरली ती ‘फतह-1’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रे असल्याचे समोर आले आहे. ही क्षेपणास्त्रे इतक्या प्रगत तंत्रज्ञानाची आहेत की ती हवाई संरक्षण प्रणाली टाळून थेट लक्ष्यावर परिणाम करू शकतात.
advertisement
इराण-इस्रायल संघर्षामुळे भारतात महागाईचा स्फोट; कोणत्या वस्तू महाग होणार?
फतह-1 ही मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून तिची श्रेणी सुमारे 1400 किलोमीटरपर्यंत आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे कमी उंचीवरून अत्यंत वेगाने प्रवास करतात. त्यामुळे त्या रडारला चकवा देतात आणि हवाई संरक्षण यंत्रणा देखील त्यांना अडवू शकत नाही. त्यामुळेच इराण इस्रायलच्या आयरन डोमला चकवून थेट देशाच्या आतवर हल्ला करण्यात यशस्वी ठरला आहे.
advertisement
इराणने जून 2023 मध्ये फतह-1 क्षेपणास्त्र जगासमोर सादर केले होते. हे क्षेपणास्त्र इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरने विकसित केले होते. नोव्हेंबर 2023 मध्ये फतह-2 नावाचा आणखी प्रगत वर्जन तयार करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राद्वारे पारंपरिक स्फोटके तसेच अणु युद्धसज्ज वॉरहेड वाहून नेता येतो. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक मानले जात आहे.
advertisement
सध्या दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. गेल्या 48 तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी तेहरानमधील संरक्षण मंत्रालय, बुशहरमधील तेल आणि गॅस रिफायनरीसह 150 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 138 इराणी नागरिक मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 हून अधिक लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच 350 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
advertisement
इराणनेही प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर 150 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यांत इस्रायलमध्ये 11 जण ठार झाले असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय इराणने इस्रायलचे 3 एफ-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराणने राजधानी तेहरानसह 7 राज्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
इस्रायल हादरले, संपूर्ण देश भीतीच्या छायेत; इराणने भेदले जगातील सर्वात सुरक्षित सुरक्षा कवच, अविश्वसनीय S-500ला धूळ चारली