स्पेनमध्ये गणेशोत्सव? हे ऐकूनच खूप भारी वाटतंय ना. खरंतर तिथे हा उत्सव साजरा करणारं मंडळच फार कमाल आहे. दोन महिन्यांपूर्वी स्थापित झालेल्या 'महाराष्ट्र मंडळ स्पेन ग्रुप'चे सदस्य परदेशात राहूनही आपल्या देशाची, आपल्या मायभूमीची परंपरा, संस्कृती जपण्याचा मनापासून प्रयत्न करतात. या मंडळाची सदस्य संख्या आहे 120. सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन मराठी संस्कृतीचं जतन करावं, मराठी मूल्य आपल्या कुटुंबियांमध्ये रुजवावीत हेच या मंडळाचं उद्दिष्ट आहे.
advertisement
बार्सिलोनामध्ये पार पडलेल्या या गणेशोत्सव सोहळ्यात बाप्पाच्या मूर्तीसह देखावाही प्रचंड आकर्षक होता. खरंतर भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेची दखल यंदा अनेक गणेशभक्तांनी घेतली आणि चांद्रयानची प्रतिकृती बाप्पाच्या देखाव्यात साकारली. 'महाराष्ट्र मंडळ स्पेन ग्रुप'च्या गणरायाच्या देखाव्यातही हेच सुंदर दृश्य पाहायला मिळालं. गणेशोत्सवात स्पेनमधील भारताचे राजदूत दिनेश पटनाईक आणि त्यांच्या पत्नी पुनम पटनाईकदेखील सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याच हस्ते बाप्पाची आरती पार पडली.
'या'ठिकाणी एका दिवसात 1 तयार होतात लाख मोदक!
विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तयार झालेल्या 'महाराष्ट्र मंडळ स्पेन ग्रुप'ने यंदा गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त करणं आणि तो यशस्वीरित्या पार पाडणं, हेच कौतुकास्पद आहे. यात मंडळातील सर्व सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गणेशोत्सवात 200 ते 250 भाविक सहभागी झाले होते. शिवाय त्यांनी सोहळा थोडक्यात आटोपला नाही बरं का...तर छान साग्रसंगीत उत्सव पार पडला. यावेळी मंडळातील सदस्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी मराठी गाण्यांवर नृत्य सादर करून आनंद साजरा केला.
11 हजार रुद्राक्षांचा बाप्पा आणि अष्टविनायकाचं दर्शन, कुठं? पाहा Video
दरम्यान, या मंडळाचं अध्यक्षपद आहे ऋषिकेश लाचुरे यांच्याकडे. तर, गौतम रॉय, देवेंद्र, तुषार फेणीकर, सुमीत कुटवाल, नितीन जोशी, शंभूराज, सौ. वैशाली मावळणकर, सौ. सोनाली लाचुरे, स्वरुप वैद्य , ऋतुजा दिघे, मेघा, प्रांजली वनीकर, इत्यादी सदस्यांचा या मंडळात समावेश आहे. सर्व सण-उत्सव सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक सदस्यावर ठराविक जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जी ते उत्तमपद्धतीने सांभाळत आहेत.