दिसत होतं 'ही' भयंकर लक्षणं
या मुलीला गेल्या काही महिन्यांपासून सतत मळमळ, उलट्या आणि भूक न लागण्याचा त्रास होत होता. घरच्यांनी तिला सुरुवातीला तालुक्याच्या डॉक्टरांकडे नेले, तिथून अमरावतीला आणि नंतर नागपूरलाही उपचारासाठी घेऊन गेले. पण कुठेच तिच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर, हतबल होऊन तिच्या पालकांनी तिला अमरावतीमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांच्या रुग्णालयात दाखल केले.
advertisement
या अवस्थेला म्हणतात 'ट्रिचोबेझोआर'
डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली आणि पोटात काहीतरी गंभीर असल्याचा संशय आल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. 17 जुलै रोजी झालेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांना मुलीच्या पोटात (जठरात) केसांचा एक मोठा गोळा आढळला, ज्याचं वजन जवळपास अर्धा किलो होतं. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला 'ट्रिचोबेझोआर' म्हणतात. केसांचा हा गोळा पोटात जमा झाल्यामुळे मुलीला काहीही खाणं-पिणं शक्य होत नव्हतं, तिची पचनक्रिया पूर्णपणे बिघडली होती.
अखेर डाॅक्टरांनी केसांची गाठ बाहेर काढली
मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला गेल्या तीन ते चार वर्षांपासून केस उपटून खाण्याची सवय होती. घरच्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं, पण ही सवय काही सुटली नाही. जेव्हा तिला तीव्र पोटदुखी सुरू झाली आणि तिने खाणं बंद केलं, तेव्हाच त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि तिला रुग्णालयात आणलं गेलं. डॉ. उषा गजभिये यांच्यासोबत डॉ. जयेश इंगळे आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्नांनी ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
डाॅक्टरांनी पालकांना दिला महत्त्वाचा सल्ला
डॉक्टरांनी पालकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे: आपली पचनसंस्था केस पचवू शकत नाही. त्यामुळे केस पोटात गेले तर ते आतल्या भिंतींना चिकटून बसतात आणि हळूहळू एका मोठ्या गोळ्याचं रूप घेतात. म्हणून, पालकांनी आपल्या मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर मुलं जास्त शांत राहत असतील, चिंताग्रस्त असतील किंवा विचित्र वस्तू खात असतील, तर तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असे डॉक्टरांनी आवाहन केले आहे. मुलांमधील अशी लक्षणं वेळीच ओळखणं महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा : Video : ... आणि तो हवेत उडाला! पापा की परी झालं जुनं, पापा का पराचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
हे ही वाचा : Escalator मध्ये अडकलं लहान मुलाचं डोक, तासभराच्या प्रयत्नांनंतर सुटका; Rescue व्हिडिओ व्हायरल