Video : ... आणि तो हवेत उडाला! पापा की परी झालं जुनं, पापा का पराचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर हा व्हिडीओ एक अपघाताचा आहे. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी तुमचा हृदयाचा ठोका चुकेल आणि तुम्हाला हसायला देखील येईल.
मुंबई : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला असंख्य असे व्हिडीओ पाहायला मिळतील. काही व्हिडीओ मजेदार असतात, तर काही धक्कादायक क्षणांचे, तर काही व्हिडीओ हे आपल्याला माहिती देतात. पण एक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे तो व्हिडीओपाहून हसावं की त्या माणसाची कीव करावी असं तुम्हाला होईल.
खरंतर हा व्हिडीओ एक अपघाताचा आहे. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी तुमचा हृदयाचा ठोका चुकेल आणि तुम्हाला हसायला देखील येईल,
नक्की असं काय घडलं?
व्हिडिओमध्ये दिसतं की शोरूमच्या बाहेर स्टँडवर डिस्प्लेला एक बाइक ठेवलेली आहे. त्याच वेळी एक तरुण येतो आणि परवानगी न घेता थेट बाइकवर बसतो. ती बाइक डबल स्टँडवर असते, त्यामुळे त्या गाडीचे दोन्ही चाक हवेत तरंगत असतात. ही व्यक्ती कसलाही विचार न करता गाडी सुरु करतो.
advertisement
ती व्यक्ती गाडीला किक मारायला लागते. पहिल्या-दुसऱ्या किकला काही होत नाही, पण तिसऱ्याच प्रयत्नात बाइक अचानक सुरू होते. गाडी आधीच गिअरमध्ये असल्याने ती थेट रॅम्पवरून रॉकेट सारखी उडते आणि काही कळायच्या आत रस्त्यावर धाडकन कोसळते. युवकही जोरात आपटतो. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत होते. शिवाय दुसऱ्या गाडीवर आदळल्यानं तिनं देखील नुकसान झालं.
advertisement
हा व्हिडिओ ‘Arhant Shelby’ नावाच्या अकाउंटवरून एक्स (Twitter) वर पोस्ट करण्यात आला आहे. हजारोंनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्याला लाईक केलं आहे. लोकांनी या प्रसंगावर भन्नाट कमेंट्स दिल्या, काहींना या व्यक्तीला 'पापा का परा' म्हटलं आहे.
@gharkekalesh pic.twitter.com/ducX8UyPKA
— Arhant Shelby (@Arhantt_pvt) July 22, 2025
advertisement
काहींनी हे पूर्णपणे शोरूमची चूक असल्याचं म्हटलं आहे. फक्त डिस्प्ले साठी ठेवलेल्या बाइकमध्ये पेट्रोल किंवा बॅटरी का ठेवली होती? आणि ती गिअरमध्येच का होती? सुदैवानं या अपघातात युवकाचे प्राण वाचले आहे, पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ नक्कीच शिकवण देतो की दुसऱ्याची वस्तू परवानगीशिवाय हाताळण्याचा परिणाम हा कधीकधी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे अशावेळी सावध रहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : ... आणि तो हवेत उडाला! पापा की परी झालं जुनं, पापा का पराचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?