Escalator मध्ये अडकलं लहान मुलाचं डोक, तासभराच्या प्रयत्नांनंतर सुटका; Rescue व्हिडिओ व्हायरल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ती जागा एवढी लहान होती की त्यामध्ये त्या मुलाचं डोक गेलंच कसं असा प्रश्न उपस्थीत झाला. शिवाय आता या मुलाचं डोकं याच्या बाहेर काढणार तरी कसं? असा विचार करत आजूबाजूचे सगळेच घाबरले होते.
मुंबई : लहान मुलं म्हटली की त्यांच्या खोड्या आल्याच. लहान मुलं कधीच एका जागेवर जास्त वेळ थांबत नाहीत आणि कधीच शांत देखील बसत नाहीत. त्यांचं मन चंचल असतं त्यामुळे ते सतत काही ना काही खोड्या करत असतात. ते हे सगळं नकळत करत असतात, त्यामुळे त्यांच्या कृत्याचं काय परिणाम होईल याचा अंदाजा त्यांना नसतो, ज्यामुळे कधीकधी ते संकटात देखील सापडतात.
यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा एस्केलेटर आणि बाजूच्या भिंतीत अडकला होता. आश्चर्य म्हणजे त्या मुलाचं डोकं तिथे अडकलं होतं. ती जागा एवढी लहान होती की त्यामध्ये त्या मुलाचं डोक गेलंच कसं असा प्रश्न उपस्थीत झाला. शिवाय आता या मुलाचं डोकं याच्या बाहेर काढणार तरी कसं? असा विचार करत आजूबाजूचे सगळेच घाबरले होते. नशिबानं कोणीतरी तो एस्केलेटर थांबवला होता. नाहीतर काय अनर्थ घडला असता. याचा अंदाजा तुम्ही व्हिडीओ पाहून लावूच शकता.
advertisement
त्याला बाहेर काढण्यासाठी तिथे असलेल्या लोकांना आणि मुलाच्या कुटुंबाला तब्बल काही तास मेहनत करावी लागली. अखेर सगळ्यांनी मिळून काळजीपूर्वक त्याला सुरक्षित बाहेर काढले. गंभीर दुखापत झाली नसली तरी खबरदारी म्हणून मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
advertisement
ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आणि इंस्टाग्रामवर @livingchina या अकाउंटवर शेअर केली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – "एक लहानसा शोधक बालपण... आशा आहे की पुढे अधिक समजदारी दाखवेल."
व्हिडिओवर अनेकांनी मजेदार आणि शिकवण देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी यासारखाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दारूच्या नशेत एक माणूस दारूच्या दुकानाच्या ग्रीलमध्ये अडकला होता. तो बंद दुकानातून दारू चोरण्याचा प्रयत्न करत होता, पण अडकून बसला आणि नंतर इतर ग्राहकांच्या मदतीने त्याला बाहेर काढावं लागलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 8:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Escalator मध्ये अडकलं लहान मुलाचं डोक, तासभराच्या प्रयत्नांनंतर सुटका; Rescue व्हिडिओ व्हायरल