मेक्सिकोतील डुरंगो इथली ही धक्कादायक घटना आहे. पालोमा निकोल अरेलानो एस्कोबेडो असं या मुलीचं नाव आहे. 14 वर्षांची पालोमा रुग्णालयात होती, तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. श्वसानाच्या आजाराने तिचा मृत्यू झाल्याचं कारण देण्यात आलं.
अंत्यसंस्कारावेळी समोर आलं मुलीच्या मृत्यूचं सत्य
वडिलांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली तेव्हा त्यांना काहीतरी विचित्र दिसलं. मुलीच्या मृत्यूचं सत्य काही वेगळंच असल्याचा संशय त्याला आला.
advertisement
आई व्हायचंय! सिंगल महिलेने सोशल मीडियावर शोधला स्पर्म डोनर, जन्माला आलं असं मूल की...
कार्लोने सांगितलं, रुग्णालयाने मृत्यूचं कारण आजार म्हणून देऊन लगेच मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं. इतक्या लगेच प्रमाणपत्र लवकर जारी केलं हे त्याला विचित्र वाटले. त्याने आरोप केला की मृत्यूचं खरं कारण लपवण्यासाठी खोटं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं.
दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारादरम्यान जेव्हा त्याने त्याच्या मुलीच्या शरीरावर इम्प्लांट्स आणि शस्त्रक्रियेचे व्रण पाहिले तेव्हा त्याला सत्य कळलं. त्याचा आरोप आहे की त्याच्या मुलीचा मृत्यू अनधिकृत ब्रेस्ट एनलार्जमेंट सर्जरीमुळे झाला.
डासांची फॅक्ट्री! कारखान्यात तयार केले जात आहेत डास, पण का? त्याचं करणार काय?
कार्लोसने अंत्यसंस्कारानंतर लगेचच पोलीस तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, आरोप आहे की आई आणि तिच्या प्लॅस्टिक सर्जन जोडीदाराने अल्पवयीन मुलीवर संमतीशिवाय स्तन प्रत्यारोपण आणि इतर शस्त्रक्रिया केल्या.
याआधीही ब्रेस्ट सर्जरीमुळे मृत्यू
कॉस्मेटिक सर्जरीने जीव गमावण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच तुर्कीमध्ये अशीच एक घटना घडली. जूनमध्ये 31 वर्षीय गायिका अना बारबरा बुहार बुलड्रिनी हिचं ब्रेस्ट एनलार्जमेंट, लिपोसक्शन आणि नोझ जॉब सर्जरी केल्यानंतर मृत्यू झाला. फक्त दोन दिवसांच्या प्राथमिक सल्ल्यानंतर ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले.
तिचा नवरा एल्गर माइल्स मोजाम्बिचा दावा आहे की त्याच्या पत्नीचं ऑपरेशन नियोजित वेळेपूर्वी करण्यात आलं होतं, कारण सर्जन आदल्या रात्री पार्टी करत होता. रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास शस्त्रक्रिया संपली, पण त्यानंतर काही वेळातच अनाच्या हृदयाचे ठोके लागलं आणि रुग्णालयातील कर्मचारी विचित्रपणे वागू लागले. सुमारे 1 तास 15 मिनिटांनंतर एल्गरला सांगण्यात आलं की त्याच्या पत्नीचं हृदय बंद पडलं आहे आणि ती आता जिवंत नाही.